दुहेरी हत्याकांडाने यवतमाळला हादरा; पूर्ववैमनस्यातून काढला काटा

Murder
MurderMurder
Updated on

यवतमाळ : हॉटेलमध्ये जेवण करून घराकडे परत जात असताना पूर्ववैमनस्यातील वाद उफाळून आल्याने धारदार शस्त्राने दोघांचा खून करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता. १२) रात्री दहा वाजता आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर घडली. नवरात्रोत्सवात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात तिहेरी हत्याकांड घडले होते. यानिमित्त त्याही घटनेला उजाळा मिळाला. वसीम पठाण दिलावर पठाण (वय ३६, रा. नेताजीनगर) व उमेश तुळशीराम येरमे (३४, रा. नेताजीनगर) अशी मृतांची नावे आहेत.

या गंभीर घटनेची दखल घेत अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने अवघ्या सहा तासांत पाच जणांसह विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. छोटू अनवर खा पठाण (५४, रा. नेताजीनगर), नीरज वाघमारे (३३, रा. मधुबन सोसायटी), अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख (२८, रा. नेताजीनगर), नितीन पवार (२४, रा. वडगाव), नीलेश उईके (२२, रा. लोहारा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

Murder
सोने खरेदीची हीच योग्य वेळ; दसऱ्याला सुवर्ण संधी

मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वसीम पठाण याच्या मोबाइलवर अब्दुल रहेमान याचा फोन आला. फोन स्पीकरवर असल्याने सदर फोन कुणाचा आहे, हे पत्नीला समजले. फोनवर वसीमला बाहेर बसण्यासाठी बोलावले. लगेच मित्र उमेश येरमे व वसीम पठाण हे दोघेही बुलेटने निघून गेले. रात्री आठ वाजता उमेश व सनी बुलेट घेऊन परत आले. वसीम मित्रांसोबत बसून असल्याचे घरी सांगितले.

रात्री साडेआठ वाजता पत्नीने वसीमला फोन केला. त्यावेळी आम्हाला नीरज वाघमारे याने पार्टी दिली आहे. मित्रांसोबत जेवण करून घरी येतो, असे सांगितले. रात्री दहा वाजता पत्नीने फोन केला, असता प्रतिसाद मिळाला नाही. रात्री साडेअकरा वाजता दरम्यान सायरा बानो जाकीर शेख यांनी वसीम व उमेशचा खून झाल्याची माहिती पत्नीला दिली.

Murder
नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

छोटू अनवर खा पठाण, नीरज वाघमारे यांच्या सांगण्यावरून पतीचा खून केला, अशी तक्रार पत्नी निखत वसीम पठाण (वय २७, रा. नेताजीनगर) या महिलेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी दोघांना नेताजीनगर व चार जणांना नांदगाव खंडेश्‍वर येथून अटक केली. रात्री घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

महिनाभरापूर्वीच वाद

जवळपास एक महिनापूर्वी नीरज वाघमारे याच्या ऑफिसमोर वसीम व अब्दुल रहेमान यांच्यात वाद झाला होता. पत्नी निखत हिला माहिती मिळाल्याने तीदेखील घटनास्थळी गेली होती. त्याही वेळी नीरज वाघमारे याने तुझ्या पतीला समजावून सांग नाही तर अब्दुल, छोट यांच्या हाताने गेम करून टाकील, अशी धमकी दिली होती, असा आरोप तक्रारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.