Jobs : अरे वा! माजी सैनिकाने मिळविल्या डझनभर नोकऱ्या

मी उच्चशिक्षित आहे, पण मला नोकरी नाही, शिक्षण घेऊन उपयोग नाही, असे दुसऱ्याला दोष देत अनेक युवक नकारात्मक जीवन जगतात.
ex-servicemen prafull raut
ex-servicemen prafull rautsakal
Updated on

दर्यापूर - मी उच्चशिक्षित आहे, पण मला नोकरी नाही, शिक्षण घेऊन उपयोग नाही, असे दुसऱ्याला दोष देत अनेक युवक नकारात्मक जीवन जगतात. मात्र ध्येयाप्रती प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चितच प्राप्त होते, हे डझनभर सरकारी नोकऱ्या प्राप्त केलेले माजी सैनिक प्रफुल्ल राऊत यांनी आपल्या कृतीतून दाखवून देत युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या करसहायक पदासाठी अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील प्रफुल्ल राऊत यांची करसहायक पदावर निवड झाली आहे.

एम.ए. एलएलबीपर्यंत शिक्षण घेतलेले प्रफुल्ल राऊत हे माजी सैनिक असून त्यांनी २००२-२०१९ या कालावधीत भारतीय सैन्य दलात १७ वर्षे सेवा देऊन ते स्वगृही परतले. प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्यांनी स्पर्धापरीक्षा व एमपीएससीचा अभ्यास सुरू केला.

दोन वर्षे कोरोनात गेले तरी त्यांनी अभ्यासात खंड पडू दिला नाही. आई-वडील, पत्नी तसेच मुलगा व मुलगी यांचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत मिळेल तेव्हा अभ्यास करीत माजी सैनिक प्रफुल्ल राऊत यांनी आतापर्यंत चक्क डझनभर नोकऱ्या मिळविल्या आहेत.

यात आरबीआय सुरक्षा गार्ड, आरबीआय अटेंडर, गृहनिर्माण विभाग कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, रेल्वे स्टेशनमास्टर, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ लिपिक, एमपीएससी कर सहायक, एमपीएससी मराठी अनुवादक, एमपीएससी टंकलेखक लिपिक या पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील काही नोकऱ्या त्यांनी खुल्या जागेत मिळविल्या आहेत.

वयाच्या ४० व्या वर्षी आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत ध्येयावर विश्वास, अभ्यासात सातत्य, स्वतःवरील आत्मविश्वास, नियमित सराव यामुळे उच्चशिक्षित प्रफुल्ल राऊत यांनी सदर यश संपादित केले आहे. या यशाबद्दल त्यांचे जय बजरंग व्यायामशाळा, युवा यात्रामहोत्सव समिती आणि मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.