अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्र रॉय यांना भारतातील टॉप-टेन शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे. एवढेच नव्हे तर स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार डॉ. रॉय यांना जगातील सर्वोच्च दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीतही स्थान मिळाले आहे.
डॉ. रॉय यांच्या या उपलब्धीमुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. डॉ. राय यांनी हंगेरी देशातील डेबरसन विद्यापीठातील नॅनोफूड प्रयोगशाळेमध्ये अतिथी शास्त्रज्ञ म्हणून कार्य करीत असताना मल्टिड्रग प्रतिरोधक सूक्ष्मजीवांशी लढण्यासाठी कार्बन नॅनोडॉट्सचा अभ्यास केला आहे.
नॅनो आधारित अँटीमायक्रोबियलवरील कार्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. रॉय यांचे संशोधन अतिशय मोठे आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि नॅनोमेडिसिनचा समावेश आहे. संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी त्यांनी चांदीच्या नॅनोकणांवर अभ्यास केला.
त्याचबरोबर ते आता वनस्पती रोगांचे व्यवस्थापन, यावरही अभ्यास करीत आहेत. ४५० हून अधिक शोधनिबंध, स्प्रिंगर, अॅल्सवियर, वायली यासारख्या प्रतिष्ठित प्रकाशकांद्वारे प्रकाशित ७५ पुस्तकांसह त्यांनी १०२ पेक्षा जास्त लेखसुद्धा लिहिले आहेत.
त्यांना फादर टी. ए. मॅथिअस अवॉर्ड (१९८९), भारत सरकारचा मेदिनी अवॉर्ड मिळाले आहेत. तर यावर्षी त्यांना त्यांच्या रिसर्च डॉट कॉम बायोलॉजी व बायोकेमेस्ट्रीमध्ये इंडिया लिडर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. राय यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रााझिल, स्वीत्झर्लंड, हंगेरी, पोलंड, इटली यासारख्या अनेक देशांमध्ये कार्य आहे.
त्यांनी जिनेव्हा विद्यापीठ, निकोलस कोपर्निकस विद्यापीठासह जगभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये अतिथी वैज्ञानिक व प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. २०१२ ते २०२३ या कालावधीतील त्यांच्या कार्यासाठी पोलिश सरकारने त्यांना एन. ए. डब्ल्यू. ए. फेलोशिप देऊन सन्मानित केले आहे.
संशोधनाव्यतिरिक्त डॉ. राय हे २० आंतरराष्ट्रीय जर्नल्स, १० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळाचे सदस्यही आहेत. आयईटी नॅनोबायोटेक्नॉलॉजीचे सहयोगी संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तीन दशकांहून अधिक शिक्षण व संशोधनात कार्य करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.