राजुरा तालुक्यात बहरले ड्रॅगन फ्रुट

कवडू बोढे यांची किमया; उष्ण वातावरणात उत्पादन
ड्रॅगन फ्रुट
ड्रॅगन फ्रुटsakal
Updated on

राजुरा : जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने अनेक शेतकरी शेती करतात. बोटावर मोजण्याइतके शेतकरी शेतीत बदल करीत आहे. पण जे नवनवे प्रयोग करीत आहेत. त्यांना त्याचे फायदे दिसू लागले आहेत. याच मालिकेत राजुरा येथील कवडू बोढे यांचा समावेश आहे. त्यांनी पारंपारिक शेतीसोबतच ड्रॅगन फ्रुटची शेती करून सर्वांना चकीत केले आहे.

राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील कवडू बोढे हे २०१७ रोजी वेकोलितून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते वडिलोपार्जित असलेल्या शेतीकडे वळले. या कामात त्यांचा मुलगा रवी मदत करीत आहे. रवी बोढे याने कृषीची पदवी घेतली. तो ग्रामसेवक म्हणून काम करीत आहे. नोकरीबरोबर व्यवसाय म्हणून पारंपरिक पीक न घेता सेंद्रिय पद्धतीने चक्क विदेशी ड्रॅगन फ्रुटची त्याने लागवड केली आहे. कमी खर्च आणि कमी जागेत उत्पन्न देणारे पीक म्हणून या फळाची ओळख आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा वर्षांअंती हिशोब काढला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यापुढे कर्जाचा डोंगर उभा राहतो. कर्जाची परतफेड करताना त्यांना नाकीनऊ येते.

ड्रॅगन फ्रुट
पुढे ढकललेल्या परीक्षा 'या' दिवशी होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

ही परिस्थिती टाळण्यासाठी विहीरगाव येथील कवडू बोढे व मुलगा रवीने सकाळ अॅग्राोवन वर्तमानपत्रात शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या. पश्चिम महाराष्ट्रातील शेती बघून पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय पद्धतीने चक्क विदेशी ड्रॅगन फ्रुटची लागवड त्यांनी केली.रवीने त्याच्या वडिलोपार्जित दोन एकर पडीत शेतीपैकी एक एकर क्षेत्रात २०१८ मध्ये ड्रॅगन फ्रुट या विदेशी फळझाडांची लागवड केली. यासाठी गुजरात येथून मित्राच्या मदतीने दोन हजार रोपटे मागविली. यासाठी एकूण जवळपास तीन लाख पन्नास हजार रुपये खर्च आला. या झाडांची दोन वर्षभर सेंद्रिय पद्धतीने नियोजन केले. परिणामी तिसऱ्या वर्षांपासून फळधारणा होऊन उत्पन्नही सुरू झाले.

यावर्षी जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या झाडांचे आयुर्मान ३५ ते ४० वर्ष असल्याने दीर्घकालीन उत्पादन मिळते. सध्या कोरोना काळात फळाला मोठी मागणी असून या फळाची चंद्रपूरसह लगतच्या तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील व्यापारी शेतात येऊन खरेदी करीत आहे. या फळांमध्ये प्रथिने, स्निग्धपदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, जीवनसत्व बी व क असे अन्न घटक आहे. मधुमेह, कॉलेस्ट्रॉल, संधिवात, दमा, कर्करोग, डेंगी या आजारावर गुणकारी असल्याचे सांगितले जात आहे.

"चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान जास्त आहे. अशा वातावरणात हे पीक घेणे कठीण आहे. योग्य नियोजन केल्याने हे पीक घेता येते. कमी पाण्याचे व कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ड्रॅगन फ्रुटची ओळख आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हि शेती करणे फायद्याचे ठरेल."

- रवी बोढे, शेतकरी विहीरगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.