गोंदिया : मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यात नाल्यालगत असलेला घर कोसळून एकाचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (ता. १०) सकाळच्या सुमारास घडली..जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेला एक घर पाण्यात कोसळला. यात दिपिन अग्रवाल (वय २७) या युवकाचा मृत्यू झाला असून किरण अग्रवाल (वय ५०) या मलब्याखाली दबल्याची माहिती आहे.अनिल अग्रवाल (वय ५२) हे यातून थोडक्यात बचावले आहेत. दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, किरण अग्रवाल यांचे शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. दरम्यान, रात्रभर पावसामुळे जिल्ह्यात मंगळवारी अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यातील गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. ग्रामीण भागातील नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटलेला आहे..जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्वच मोठ्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाण्याची वाढ झाल्याने धरण सुस्थितीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार धरणांचे वक्रद्वार उघडण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह बाघ, पांगोली, चुलबंद आदी नद्यांना पूर आला आहे.तसेच तालुक्यातील चुटीया येथील लक्ष्मण मारगाये (वय ४२) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळून गंभीर जखमी झाले. तर काटी येथे गोठा कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला.मंगळवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात १६७.४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात तालुकानिहाय नोंदी पाहता सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून गोंदिया तालुक्यात २०७.९ मिमी.सरासरी पावसाची नोंद करण्यात आली असून आमगाव तालुक्यात १४०.० मिमी., तिरोडा ६३.७ मिमी., गोरेगाव १८२.८ मिमी., सालेकसा १९५.९ मिमी., २१०.३ मिमी., अर्जुनी-मोरगाव १४३.९ मिमी. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८७.० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.