जीवनसाथी गमावलेल्यांच्या कोरोनामध्येही जुळल्या मनाच्या तारा

During the Corona period widows divorced marriage
During the Corona period widows divorced marriage
Updated on

अमरावती : प्रेमाला कुठलेही बंधन नसते, असे म्हटले जाते. मात्र, १०० वर्षांनंतर आलेल्या कोरोनासारख्या भयानक महामारीतसुद्धा मानवजातीला एकसूत्रात बांधणाऱ्या प्रेम या दोन अक्षरांनी एकमेकांना बांधून ठेवले. जीवनसाथी गमाविलेल्या किंवा वैचारिक मतभेदांमुळे एकमेकांपासून दूर झालेल्या घटस्फोटित, विधवा, विधुर व्यक्तींनी मात्र या महामारीतदेखील आपले प्रेम शोधले. फेब्रुवारी ते आतापर्यंत जवळपास १२ विधवा, विधुर, परित्यक्ता आणि घटस्फोटितांनी नवा संसार उभारला.

याकामी मागील सात ते आठ वर्षांपासून शहरात कार्यरत असलेल्या सामाजिक परिवर्तन परिषदेचे संस्थापक अनिल भगत यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. सामान्यपणे आजही विधवा आणि विधुरांचा पुनर्विवाह ही बाब समाजमान्य होत नाही. त्यातही घटस्फोटित, परित्यक्‍त्या महिला आणि पुरुषांबाबत समाजात अनेक चर्चा होत असतात. त्यामुळे या व्यक्ती सहसा पुनर्विवाहासाठी तयार होत नाहीत. मात्र जीवनात येणारी संकटे, आव्हाने, आजारपण, एकटेपणाची भावना यामुळे या गटातील महिला-पुरुषांना जीवनसाथीची गरज निर्माण होते.

यावर्षी संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. मात्र, स्त्री-पुरुषांची नैसर्गिक ओढ कायम राहिली. परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेत मागील पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३५० विधवा, विधुर, घटस्फोटित, परित्यक्‍त्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये २० वर्षीय तरुण, तरुणींसह ६८ वर्षांपर्यंत ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळातच फेब्रुवारी, मार्चमध्ये १२ ते १६ दाम्पत्य पुनर्विवाहाच्या बंधनात अडकले होते.

विवाहानंतरची व्यसनाधीनता, अतिरेकी महत्त्वाकांक्षा, पती-पत्नीमधील तीव्र वैचारिक मतभेद, समाजाची कुटुंब व्यवस्थेबाबत कमी झालेली आस्था, विवाहापूर्वी दोन्ही कुटुंबांनी दिलेली चुकीची माहिती, व्यभिचार या सर्व कारणांमुळे पती-पत्नींमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक वाढल्याचे अनिल भगत यांनी सांगितले. अनेकदा वैवाहिक आयुष्य सुरू होताच २० व्या वर्षीच अनेक मुली विधवा झाल्या, तर अनेक तरुणांचे घटस्फोटसुद्धा झाले. त्यामुळे समाजात या वर्गाविषयी अनेक गैरसमज पसरले आहे.

पुनर्विवाह ही संकल्पना वैयक्तिक असल्याची भावनाच जणू समाजाने करून ठेवली आहे. त्यामुळे पुनर्विवाहेच्छुकांच्या जीवनात मात्र काळोख पसरला आहे. अशातच सामाजिक परिवर्तनसारख्या संस्थेने पुढाकार घेत विधवा, विधुर, घटस्फोटितांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण केला आहे. कृ. ज. पवार यांच्यापासून प्रेरणा घेत परिषदेचे खंदे कार्यकर्ते प्रा. देविदास उमप, प्रा. प्रदीप शेवतकर, विजय देवळे, प्राचार्य मंदा निमकर, वंदना मडघे, प्रा. भारतभूषण यावले आदींच्या सहकार्याने ही चळवळ सुरू आहे.

पुनर्विवाहेच्छुकांना संधी मिळावी यासाठी धडपड 
घटस्फोटित, विधवा किंवा विधुरांच्या जीवनाचा विचार करून त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी समाजाची असते. मात्र, आज दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. त्यामुळेच आम्ही समाजाकडून दुर्लक्षित या घटकावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला लोकांनी आम्हाला मुर्खात काढले. मात्र, तीच मंडळी आज आमच्या पाठीशी उभी आहे. पुनर्विवाहेच्छुकांना पुन्हा कौटुंबिक आयुष्य जगण्याची एक संधी मिळावी यासाठी आमची धडपड आहे.
अनिल भगत, संस्थापक, सामाजिक परिवर्तन परिषद. 

संपादन  : अतुल मांगे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()