मेळघाटात शिक्षणाचा खेळखंडोबा

आधीच कुपोषण, बालमृत्यूच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मेळघाटमध्ये आता शैक्षणिक संकटही नवे आव्हान म्हणून समोर येत आहे.
Education
EducationSakal
Updated on
Summary

आधीच कुपोषण, बालमृत्यूच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मेळघाटमध्ये आता शैक्षणिक संकटही नवे आव्हान म्हणून समोर येत आहे.

अमरावती - आधीच कुपोषण, बालमृत्यूच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मेळघाटमध्ये (Melghat) आता शैक्षणिक संकटही (Education Crisis) नवे आव्हान म्हणून समोर येत आहे. मेळघाटात मुख्याध्यापक, विषय शिक्षक, सहायक शिक्षकांची २१८ पदे अद्याप रिक्त (Empty Post) असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मेळघाटमध्ये बदली झालेले शिक्षकसुद्धा मुख्यालयी न राहता अप-डाउनमध्ये अडकल्याने शिक्षणाचा पार खेळखंडोबा झाला आहे.

सद्यःस्थितीत मेळघाटमध्ये एकूण ६० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. मात्र, एकत्रितपणे विचार केल्यास २१८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून अतिरिक्त असलेल्या शिक्षकांकडून कामे काढली जात आहेत. विशेष म्हणजे, पदे रिक्त असल्याने मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांना कार्यमुक्तसुद्धा करता येत नसल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. दुसरीकडे अनेक दुर्गम गावांमध्ये शिक्षक नियमितपणे जात नसल्याची ओरड होत आहे. मेळघाटच्या पायथ्याशी असलेले परतवाडा, अचलपूर तसेच अमरावतीवरून अप-डाउन करणारे अनेक शिक्षक आहेत. त्यामुळे ते वेळेत शाळेत हजर राहू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

Education
तब्बल ३५ दिवसांनी ५८ उंटांनी घेतला मोकळा श्वास

मेळघाटमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून रिक्त पदांवर पर्यायी शिक्षक देण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय तूर्त मेळघाटमधील शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही.

- ई. झेड. खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.

मेळघाटमधील रिक्त जागांसंदर्भात यापूर्वी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. रिक्त असलेल्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांच्या जागा शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्यात याव्या, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनाकडे केली आहे. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

- राजेश सावरकर, पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.