नंदुरबार : गावापासून रुग्णालयापर्यंत जायला रस्ता नाही. पायवाट आहे मात्र ती नदीमधून जाते. सध्याच्या जोरदार पावसामुळे नदीलाही पूर. त्यामुळे गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी रूग्णालयात न्यावे कसे? असा प्रश्न कुटुंबीयांना पडला. प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेला रूग्णालयात पोहोचवणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन कुटुंबातील तिघा-चौघांनी थेट नदीतील पुराच्या पाण्यातून बांबूची झोळी करून आठ किलोमीटर पायपीट करीत तिला रूग्णालयात पोहोचवले.