Eknath Shinde : खरी परीक्षा मुख्यमंत्र्यांची!

उमेदवार फक्त परीक्षेला बसला आहे, अभ्यास महायुतीतील सर्व घटक पक्षांना करायचा आहे.
Eknath Shinde : खरी परीक्षा मुख्यमंत्र्यांची!
एकनाथ शिंदेsakal
Updated on

यवतमाळ : ‘ही लोकसभेची निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणे महायुतीतील सर्वच घटक पक्षांची जबाबदारी आहे,’ असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत केले.

Eknath Shinde : खरी परीक्षा मुख्यमंत्र्यांची!
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेस 2 कोटी 15 लाखाचा नफा

यवतमाळ-वाशीम लोकसभेची उमेदवारी ऐन वेळी जाहीर केल्याने व खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापल्याने आता खरी परीक्षा आहे ती राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व घटक पक्षातील सर्व आमदारांची! उमेदवार फक्त परीक्षेला बसला आहे, अभ्यास महायुतीतील सर्व घटक पक्षांना करायचा आहे.

Eknath Shinde : खरी परीक्षा मुख्यमंत्र्यांची!
Nashik News : एमपीसिबीतर्फे उद्योगांना बँक गॅरंटीबाबत नोटीस; उद्योगांकडून ऑनलाइन अपलोड पण प्रत्यक्षात दाखवला ठेंगा

महायुतीत यवतमाळ-वाशीम हा लोकसभा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला. गेली २५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी यांनी केले. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांचा नैसर्गिक दावा होता. संजय राठोड यांनीही उमेदवारी मागितल्याने पक्षप्रमुखासमोर मोठा पेच निर्माण झाला. अखेर दोघांनाही उमेदवारी न देता हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना ऐन वेळी उमेदवारी जाहीर केली. ही तारेवरची कसरत करीत असताना खासदार भावना गवळी बंड करणार नाहीत व राठोड पक्षाची धुरा खांद्यावर घेतील याची काळजी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने त्यांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. येथे तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची संघटनात्मक बांधणी मजबूत नसल्याने आणि महायुतीच्या राजश्री पाटील यांच्यासाठी जातीय समीकरण जमेची बाजू असल्याने सामना रंगतदार होणार हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.