अहेरी (जि. गडचिरोली) : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील ग्रामपंचायत सर्वानुमते बिनविरोध निवडून आल्यास विशेष भेट म्हणून त्या ग्रामपंचायतीला 25 लाखांचा विकास निधी देणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही सर्वोच्च सभागृहाचा दर्जा प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्था असून विकास कामाचे ग्रामपंचायत हे केंद्रबिंदू बनले आहे. गावात एकोपा व संघटन टिकून असले की, गावाच्या विकासासाठी व कायापालटासाठी कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोधपणे निवडून आल्यास अशा ग्रामपंचायतीला 25 लाखाचा विकास निधी देण्यात येईल.
"गावाच्या विकासासाठी" या संकल्पनेतून आपले हे ध्येय असून सर्वसंमतीने ग्रामपंचायत सदस्यांची व सरपंचांची बिनविरोध निवड केल्यास एक वेगळा पायंडा तयार होईल व एक आदर्श इतिहास रचला जाईल. अशा ग्रामपंचायतींना गौरव व प्रोत्साहन म्हणून आपण 25 लाखांचा विकास निधी देऊ आणि सोबतच गावाच्या अन्य कोणत्याही विधायक कामांसाठी पुढाकार घेऊन विशेष लक्ष पुरविले जाईल, असेही आमदार आत्राम यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा - पती पर्यटनासाठी गेले अन् घरचा फोन खणखणला; हॅलोऽऽ...
ग्रामीण भाग व खेडी स्वयंस्फूर्त स्वावलंबी व्हावीत, हेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उद्दिष्ट असून आपणसुद्धा त्यासाठीच धडपड करत आहोत. अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान सर्वानुमते व बिनविरोधपणे ग्रामपंचायत निवडून आणल्यास 25 लाखांचा विकास निधी आणि अन्य विकास व विधायक कामांसाठी भरीव निधी देऊन अशा ग्राम पंचायतीकडे विशेष लक्ष पुरविणार असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.