Etapalli : नाकाबंदीदरम्यान दुचाकीसह दोन बंदुका सोडून दोघे पळाले
एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्यातील एटापल्ली- कसनसूर मार्गावर नाकाबंदीदरम्यान पोलिसांना पाहून पळालेल्या दोन संशयितांनी काही अंतरावर दुचाकी उभी करून जवळची चटई पाण्यात फेकली. ही पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन बंदुका आढळल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस विभागही अचंबित झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार एटापल्लीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी रविराज कांबळे हे उपनिरीक्षक संतोष मोरे, सविता काळे व सहकाऱ्यांसह गुरुवार (ता. १३) सकाळी ७ वाजतापासून कसनसूर मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची झडती घेत होते.
यावेळी सकाळी ९: ३० वाजताच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच ३३ डी- ५७४९) वरून दोघे आले. पोलिसांना पाहून ते जागीच थबकले. त्या दोघांनी दुचाकी तेथेच उभी केली. त्यांच्याजवळ असलेली चटई त्यांनी एका नाल्यात टाकली व तेथून लगेच धावत सुटले. पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जंगलातून पसार झाले.
दरम्यान गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी चटई उचलली असता त्याखाली दोन रायफल आढळल्या. या शस्त्रासह दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
दोन्ही संशयित आरोपी नेमके कोण, रायफल जवळ बाळगण्याचा उद्देश काय, ते शिकारीवर निघाले होते, की नक्षल्यांशी त्यांचे काही संबंध आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.