नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबातील 25 सदस्यांना नोकरी

gadchiroli
gadchiroliANI
Updated on

गडचिरोली: गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस एक विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी पात्रतेनुसार वर्ग-3 व वर्ग -4 च्या पदावर अटींच्या अधीन राहून शासन सेवेत थेट नियुक्ती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 152 शिफारशींपैकी 25 जणांना नोकरी देण्यात आली असून इतर प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे.

gadchiroli
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

नक्षलवाद्यांकडून मारल्या गेलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबापैकी पात्र असणाऱ्या एका व्यक्तीसाठी पोलिस अधीक्षक हे प्रमाणपत्र देण्यास सक्षम आहेत. पोलिस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयास एकूण 180 प्रस्ताव प्राप्त झाले असून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक तसेच आवश्‍यक पात्रतेनुसार जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडून रिक्त असलेल्या पदांची तातडीने माहिती घेऊन त्यातील रिक्त पदांवर नियुक्ती करण्याकरिता 2018 पासून ते आतापर्यंत वर्ग-3 करिता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांच्याकडे 38 उमेदवार, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे 8 उमेदवार, जिल्हा अधीक्षक गडचिरोली यांच्याकडे 4 उमेदवार, पोलिस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे 89 उमेदवार, परिवहन महामंडळ गडचिरोली यांच्याकडे 1 उमेदवार, जिल्हा हिवताप कार्यालय यांच्याकडे 2 उमेदवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांच्याकडे 4 उमेदवार, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांच्याकडे 1 उमेदवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे 2 उमेदवार, महसूल विभागात 3 उमेदवार असे एकूण 152 उमेदवारांना शिफारस करण्यात आली आहे.

gadchiroli
Online Passport: कोरोनाकाळात पासपोर्ट काढायचा आहे? मग या ऑनलाइन स्टेप्स करा फॉलो

त्यापैकी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ. मर्या. नाशिक यांच्याकडून 8, महसूल विभाग-3, वनविभाग 8, पुरवठा विभाग 4, कृषी विभाग 1, जिल्हा हिवताप कार्यालय 1 अशा एकूण 25 उमेदवारांना संबंधित विभागांकडून नियुक्ती देण्यात आली आहे.

प्रशासन प्रयत्नशील

या यादीतील उर्वरित उमेदवारांना नियुक्त करण्याबाबतची संबंधित कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे. सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाकडे शिफारसीकरिता शिल्लक असलेले उमेदवारांना नियुक्ती देण्याचे दृष्टीने विविध कार्यालयाकडून रिक्त पदाची माहिती घेण्यात येत असून नक्षलपीडित उमेदवारांना तातडीने लाभ देण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()