चिमूर (जि. चंद्रपूर ) : चांगले उत्पन्न व्हावे, यासाठी सावरी(बिड )येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज घेऊन सोयाबीन पेरले. मात्र, रोगाने शेंगाच लागल्या नाही, तर धानावर करपा आला. त्यामुळे सोयाबीन आणि धान दोन्ही पेटवून दिले. कापसावर अखेरची आशा होती. मात्र, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे झाडे उपटून टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही. तिन्ही पिके हातचे गेले. आता कर्ज फेडायचे कसे? असा सवाल शेतकरी करत आहे.
मुरलीधर नत्थू रामटेके, असे शेतकऱ्याचे नाव आहे. मुरलीधर यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात राबराब राबतत. चांगले पीक येईल, या आशेवर स्वतःजवळची पुंजी, सावकार आणि बँकेकडून कर्ज घेऊन पेरणीपासून तर मशागतीचा खर्च केला. मात्र, निसर्ग व रोगामुळे सर्व आशेवर पाणी फेरले आणि पदरी निराशाच पडली. त्यामुळे शेतातील धान व सोयाबीन पिकाला आग लावली. यामुळे त्यांची संपूर्ण आस कापसावर होती. मात्र, संकट काही त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. कापूस पिकालाही बोंडअळीने घेरले. त्यामुळे कापसाचे पीक उपटून नष्ट करण्याशिवाय पर्याय उरलाच नाही. उत्पन्नाचे सर्व मार्ग खुंटल्याने आता कर्ज कसे फेडायचे, असा सवाल मुरलीधर कृषी विभाग, शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.