बुलढाणा- लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर, रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात... जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा ठेका घेतलाय.. ही मक्तेदारी मोडीत काढत शेतकरी कुटुंबाने आपल्या नवरी मुलीची चक्क मिरवणूक घोड्यावर काढल्याचे हातनी येथे पहावयास मिळाले.
बुलडाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी आपली मुलगी नववधू निकिता हिची गावातून घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. मुला समान मुलगीही असते, हा भेदभाव न करता या कृतीतून जाधव परिवाराने समाजाला दाखविलेय.. निकिताचा विवाह नुकताच दिवठाणा येथील धनंजय मोरे यांचेशी थाटामाटात पार पडला.
तत्पूर्वी सकाळी वधू निकिताची घोड्यावरून गावातून डीजे च्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती. जाधव परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवलाय. समाजाला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश ही यातून दिलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.