Farmer News : शेतकऱ्यांनी 'अशा' पद्धतीने वाचविले ९८ कोटी रुपये

farmer compensation
farmer compensationesakal
Updated on

अमरावती : उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच शेतकऱ्यांचा ताणही कमी व्हावा यासाठी कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा तसेच बीबीएफ वापर करून ९७ कोटी ५२ लाख रुपयांची बचत केली आहे.

farmer compensation
Nagpur: एक कोटी घ्या विधानपरिषदेत प्रश्न विचारायचा नाही, आमदार मिर्झांची होणार ACB चौकशी

गतवर्षीच्या हंगामात सोयाबीन बियाण्यांचा दर १०० ते ११० रुपये होता. पेरणीसाठी प्रती हेक्टर साधारणतः अडीच बॅग लागतात. ३० किलोची एक बॅग राहत असून प्रती हेक्टर ७५ किलो बियाणे लागते. बाजारातील दर बघता पेरणीसाठी बियाण्यांचा खर्च अधिक राहतो.

बाजारदराने बियाणे घेतल्यास वाढणारा खर्चाचा ताण कमी व्हावा यासाठी घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यासाठी गावपातळीवर बीज परीक्षण व उगवण क्षमता तपासणीचे प्रशिक्षण देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

farmer compensation
Eknath Shinde: फडणवीस म्हणाले 'मी पुन्हा येईन' ही CM शिंदेंसाठी चिंतेची बाब; राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ११७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होती. यासाठी १ लाख ८९ हजार ८८ क्विंटल बियाणे लागण्याची शिफारस करण्यात आली होती. यापैकी ६६,१८१ क्विंटल बियाणे कृषी केंद्रांमार्फत विकल्या गेले. तर, तब्बल १ लाख २२ हजार ९०७ क्विंटल घरगुती बियाण्यांचा वापर करून ९४.६३ कोटी रुपयांची बचत केली आहे. बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के होते.

बीबीएफ व पट्टापेर पद्धतीने शेतकऱ्यांची प्रति हेक्टर १५ किलोची बचत होत असून गेल्या हंगामात त्यांनी ३७५० क्विंटल बियाण्यांची बचत केली. एमआरपीनुसार ४.५० कोटी व किमान आधारभूत किमतीने १.६१ कोटी रुपयांची बचत केली आहे. या हंगामात बीबीएफ व पट्टापेर पद्धतीने २.८९ कोटीची बचत झाली आहे.

"घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी गावपातळीवर प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. गेल्या काही वर्षात या बियाण्याचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा पेरणीखर्च वाचला असून त्या बियाण्यांचे निकालही चांगले आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांच्या वापरावर अधिक भर द्यावा."

- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.