Crime: शेत रस्त्यासाठी ४० हजाराची मागणी केल्याने तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Crime
Crimeesakal
Updated on

शेगाव: शेत रस्‍त्‍यासाठी वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील काम होत नसल्‍याने अखेर शेतकऱ्याने नायब तहसीलदारांसमोर विष प्राशनाचा टोकाचा निर्णय घेऊन आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न केल्‍याची घटना आज (ता.३) शेगाव तहसील कार्यालयात घडली.

शेगाव तालुक्यातील जलंब येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक सुपडाजी सुलताने यांच्या शेतात जाण्यासाठी आणि शेती करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. यामुळे शेजारील शेतकऱ्यांसोबत नेहमी वादविवाद आणि भांडण तंटे होत होते.

Crime
Sharad Pawar: शरद पवारांना दुसरा धक्का? 'हा' खासदार देणार राजीनामा

या संदर्भात सदर शेतकऱ्याने न्यायालयात दिवाणी आणि तहसील कार्यालयात रस्त्यासाठी प्रकरण दाखल केले. मात्र, शेतकरी सुलताने यांच्या आरोपानुसार शेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पवार यांनी आपल्याला दिवाणी न्यायालयातून केस मागे घेण्यासाठी बाध्य करीत तुम्हाला तत्काळ शेत रस्ता उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले.

त्यानुसार सदर शेतकऱ्याने प्रकरण मागे घेतले. मात्र, सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी शेत रस्ता उपलब्ध करून दिला नाही.

दुसरीकडे माझा तहसील कार्यालयाने प्रकरण खारिज करून टाकले. याबाबत उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्याकडे दाद मागितल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतात भेट देऊन आपल्याला तीन महिन्याच्या आत तहसील कार्यालयाने रस्ता उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

या आदेशालाही केराची टोपली दाखवीत आपल्याला नायब तहसीलदार पवार यांनी रस्ता देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केली.

शेवटी त्रस्त होऊन आज चिमुकल्या मुलासोबत तारखेवर हजर झालेल्या शेतकऱ्याने नायब तहसीलदार पवार यांच्या समक्ष विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. याघटनेने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.

Crime
Kanhoji Angre : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पठ्ठ्यानं ब्रिटीशांना पळता भुई थोडी करून सोडली!

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने सदर शेतकऱ्याला शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

शेतकरी सुलताने यांनी २ वर्षापूर्वी केलेला अर्ज हा महसुलाच्या वेगळ्या कायद्यानुसार केला होता. त्या नियमात अर्ज प्रकरण बसत नसल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी फेटाळले होते.

एक महिन्यापूर्वी त्यांनी शेतीला रस्ताच नसल्याने रस्ता मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्याचा स्थळ पाहणी अहवाल अद्यापही तलाठ्याकडून प्राप्त झाला नाही. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.

-समाधान सोनवणे, तहसीलदार, शेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.