डिजिटल युगातही शेतकरी देतो पत्राद्वारे शुभेच्छा, ३७ वर्षांपासून सुरू आहे उपक्रम

farmer from yavatmal give wishes through letter from 37 years
farmer from yavatmal give wishes through letter from 37 years
Updated on

यवतमाळ : दिवाळी, वाढदिवसाला आप्तस्वकीय, मित्रमंडळीचे पोस्टाद्वारे येणारे शुभेच्छा कार्ड इतिहास जमा झाले आहे. शुभेच्छा देण्यासाठी कुणी त्या भानगडीतही पडत नाही. बाभूळगाव तालुक्‍यातील यरणगाव येथील सतीश वानखडे या प्रगतीशील शेतकऱ्याने कार्ड पाठवून शुभेच्छा देण्याचा उपक्रम मागील 37 वर्षांपासून जपला आहे. त्यामुळे एकप्रकारे मायेचा ओलावाही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ते उच्चशिक्षित आहेत.

मोबाईल क्रांती होण्यापूर्वी पोस्ट कार्ड, लिफापा, शुभेच्छापत्र आप्तस्वकीयांना पाठविले जात होते. नातेवाईक, मित्रमंडळीला पोस्टमन दिसताच अनामिक आनंद मिळायचा. सायकलवर स्वार झालेला पोस्टमन व त्यांच्याभोवती नागरिकांचा गराडा, असे चित्र सर्रास ग्रामीण व शहरी भागात दिसायचे. मोबाईल आला, सर्व जग एका मुठीत बंद झाली. त्यातही फोनद्वारे संपर्क साधण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आले. मग काय फोनवर होणारी नेहमीची बोलचालही कमी झाली.

चॅटींगद्वारेच 'हाय हॅलो'वर नागरिक आलेत. आप्तस्वकीयांना येणारे पत्र, शुभेच्छा कार्ड हे पूर्णत: बंद झाले. काळाची पावले ओळखत पोस्ट खात्यानेही ऑनलाइन कात टाकली. मात्र, बाभूळगाव तालुक्‍यातील यरणगाव येथील सतीश वानखडे हे प्रगतशील शेतकरी आहेत. ते मागील 37 वर्षांपासून न चुकता परिचयातील लोकांना दिवाळी सणानिमित्त स्नेहाचा सुगंध दरवळावा, यासाठी पोस्टाद्वारे शुभेच्छा कार्ड पाठवितात. वर्षभर कधीही घराकडे न भटकणारा पोस्टमन शुभेच्छा कार्ड देवून जातो, त्यावेळी अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसतो. 

कुठेही जा, कार्ड येणारच -
नोकरी, व्यवसायनिमित्ताने आप्तस्वकीय, मित्रमंडळी आपले बस्तान नेहमीच दुसरीकडे हलवतात. एखाद वर्ष संबंधिताला शुभेच्छा कार्ड मिळणार नाही. मात्र, लगेच दुसऱ्या वर्षी सतीश वानखडे हे बरोबर नवीन पत्ता शोधतात. त्या पत्यावर शुभेच्छा कार्ड पाठविण्यास विसरत नाहीत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना संपर्कात आलेल्या व्यक्तींशी स्नेहबंध अधिक वृद्धिंगत व्हावा, म्हणून पोस्टकार्ड पाठवायला 1986 पासून सुरुवात केली. दिवाळी हा भारतीय सण आहे. तो अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. एनएसएसचा विद्यार्थी असल्याने सामाजिक कार्याची आवडही आहे. प्राध्यापकही या उपक्रमाचे कौतुक करीत असल्याने समाधान मिळते.
-सतीश वानखडे,  प्रगतीशील शेतकरी, येरणगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()