एक फळ उपयोग अनेक; पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्यांची डाळिंबाच्या शेतीकडे धाव

farmers doing pomegranate farming in achalpur of amravati
farmers doing pomegranate farming in achalpur of amravati
Updated on

अचलपूर (जि. अमरावती) :  मागील पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या घरातील परसबागेत डाळिंबाचे झाड पाहायला मिळत होते. मात्र, आता परसबागेतील डाळिंबाचे झाड बागायती शेतात पोहोचले आहे. सध्या अचलपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिकाला फाटा देत बहुगुणी डाळिंब पिकाकडे वळले आहेत.

डाळिंब हे फळ प्रत्येकाच्या आवडीनिवडीचे असल्याने गरिबातील गरीब आवडीने खात होते. पण आता हे फळबागायतीने जागा घेतल्यामुळे सर्वसामान्यांना खाण्यासारखे राहिले नाही ते फक्त श्रीमंतांचे फळ झाले आहे, असे म्हटले तर वावगे वाटू नये. विशेष म्हणजे, या फळाला बाहेरील देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच फळापासून अनेक प्रकारचे औषधे, कपड्याला देण्यात येणारे रंग बनविले जातात. त्यामुळे या पिकाला नगदी पीक म्हणून बघितले जाते. त्यासाठी याची मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतात लागवड करतात. सध्या तालुक्यात जवळपास १२ ते १५ हेक्टर या पिकाची लागवड करून उत्पन्न घेत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. 

मागील काही वर्षांपासून शेतकरी पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिके घेऊ लागली. पूर्वी डाळिंबाचे झाड केवळ घरातील परसबागेत लावले जायचे. आता त्याची जागा बागायतीने घेतली आहे. आधी लोक आवडीने परसबागेत एक तरी डाळिंबाचे झाड लावत होते. या झाडापासून घरच्यांना आस्वाद घेता येत होता. आस्वाद घेणे एवढाच उद्देश नव्हता तर जेवणानंतर अपचन झाले असल्यास, उन्हाळी लागली असल्यास, दंतमंजन करण्यासाठी तसेच अंगाला खूप घाम येत असल्यास, महिलांच्या आरोग्यांच्या अनेक समस्यांवर डाळिंबाच्या झाडाच्या पानफुलांचा, सालीचा व मुळांचा वापर केला जात होता. वर्षभर फुलाने बहरून घराची शोभा वाढविणारे व अनेक प्रकारच्या वनौषधी उपयोग असणारे हे झाड परसातून कायमचे हद्दपार झाले आहे. 

रक्तदाब, ताप, खोकला, मूळव्याध अशा अनेक रोगांवर या फळाच्या रसाचा उपयोग होतो. आता तर बाजारातही रस विकत मिळत असतो. तो नियमित सेवन केल्यास आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच व्याधींपासून सुटका होऊ शकते.
- डॉ. वंदना मरसकोल्हे, मेळघाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()