Unseasonal Rain : अन् डोया देखत पीक मातीत मिसयलं! विदर्भातील शेतकऱ्यांची व्यथा...

Unseasonal Rain
Unseasonal Rain
Updated on

बाळापूर : ‘काल दुपारून गारपीट झाली... अन् आमच्या डोया देखत पीक मातीत मिसयलं, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिली. अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे आम्हाले हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बाळापूर तहसीलदारांकडे केली आहे.

काल शनिवारी (ता.८) तहसीलदार सय्यद ऐसानोद्दीन बाळापूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. सुरुवातीला मॉन्सूनची कृपादृष्टी असली, तरी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे. लिंबू, कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शुक्रवारी (ता.७) दुपारी व सायंकाळच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील २३ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वादळी वारा व गारपिटीसह बसलेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली असून, उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील एक हजार २४१ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी बाळापूर तहसीलदारांनी पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तालुक्यात यंदाच्या हंगामात बहुतांश भागात पर्जन्यमान अधिक राहिल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

शासन स्तरावरून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित झाल्यानंतर तालुक्यात एक हजार २४१ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे अंदाज वर्तविण्यात आला. आता संयुक्त पंचनामा करून हे नुकसान निश्चित करण्यात येणार आहे. गारपिटीने शेतकरी पुरता उद्‍ध्वस्त झाला आहे. अवघ्या १५ ते २० दिवस तोडणीचा हंगाम आलेल्या आंबा पिकावर गारांच्या मारामुळे आंबा जमिनीवर पडला आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कच्चा आंब्याची मातीमोल भावाने विक्री करावी लागणार आहे. आज शनिवारी तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन, कृषी अधिकारी नंदकुमार माने व कृषी सहायक यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.

Unseasonal Rain
Deepali Sayed: बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री दिपाली सय्यद यांची स्वीय सहाय्यकाविरोधात पोलिसांत तक्रार..

लिंबा एवढी पडली गार

तालुक्यात दोन वेळा अतिवृष्टी होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता.७) सायंकाळी तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात वाडेगावाला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. लिंबाच्या आकाराच्या गाराने परिसर बर्फ साचल्यागत पांढरा शुभ्र झाला होता. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील लिंबूच्या व आंब्यांच्या फळबागा उद्‍ध्वस्त झाल्यात तसेच गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शुक्रवारी (ता.७) सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच सुपारी व लिंबाच्या आकाराएवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या, गारांचा खच तयार झाला. गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले. कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, भाजीपाला, भुईमूग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पिकांचे झालेले नुकसान

  • लिंबू ४४२ हेक्टर

  • कांदा ४४५ हेक्टर

  • गहू १९६ हेक्टर

  • हरभरा ११ हेक्टर

  • इतर १४७ हेक्टर

  • एकूण १ हजार २४१ हेक्टर

तालुक्यातील २३ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून, एक हजार २४१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतीची पाहणी करण्यात आली आहे. आणि पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- सय्यद ऐहसानोद्दीन, तहसीलदार, बाळापूर.

Unseasonal Rain
रामलल्लाचं दर्शन घेऊन फडणवीस दिल्लीला जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Devendra Fadnavis Ram Mandir Visit

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.