गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अवकाळीच्या सावटात; ढगाळ वातावरणामुळे कडधान्यवर्गीय पिकं धोक्‍यात

farmers may face disadvantage of bad weather again
farmers may face disadvantage of bad weather again
Updated on

गोंदिया ः जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून तुरळक पाऊसदेखील हजेरी लावत आहे. त्यामुळे कडधान्य व भाजीपालावर्गीय पिके घेणारे शेतकरी अवकाळी पावसाच्या माऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. या वातावरणामुळे कडधान्यवर्गीय पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यतादेखील शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

खरीपानंतर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पर्याय म्हणून रब्बीपिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. शेताची मशागत करून हरभरा, मूग, उडीद, हरभरा, तूर, मोहरी, लाख, लाखोरी, जवस आदी पिकांची लागवड केली आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाचीदेखील लागवड केली आहे. परंतु, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने ही पिके धोक्‍यात सापडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

हिवाळ्यातील गुलाबी थंडीत अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे शेतकरी यंदाच्या रब्बी हंगामापासून मुकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. उल्लेखनीय म्हणजे, खरीप हंगामात धानपीक बहरात असताना मावा, तुडतुडा या रोगाने पिकावर आक्रमण केले होते. उत्पादनात कमालीची घट आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी पिकावर अवलंबून होती. परंतु, ढगाळ वातावरणामुळे हा हंगामदेखील हातातून निसटण्याची शक्‍यता आहे.

सोमवारी गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्‍यासह बहुतांश तालुक्‍यात तुरळक पावसाने हजेरीदेखील लावली. त्यामुळे शेतात असलेल्या कडधान्यवर्गीय पिकांवर कीडरोग लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शेतात उडीद लावले आहे. ढगाळ वातावरणाने या पिकावर मावा, तुडतुडा व इतर रोग लागण्याची शक्‍यता आहे.
-नंदकुमार रामटेके, 
शेतकरी, खांबी पिंपळगाव.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.