Buldhana News : वहिवाटीचा रस्ता पाण्यात बुडाला; धरणाच्या भिंतीवर बसून शेतकऱ्यांचं आंदोलन

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता बंद झालेला आहे.
Farmers Road Chondhi Irrigation Project
Farmers Road Chondhi Irrigation Projectesakal
Updated on
Summary

एक वर्षांपासून आम्ही निवेदन देत आहोत. परंतु, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काहीही दखल घेतली नाही. त्यामुळे २९ मे पासून प्रकल्पाच्या भिंतीवर उपोषण सुरु करण्यात आले आहे.

संग्रामपूर (बुलढाणा) : चोंढी (टाकळेश्वर) लघु पाटबंधारे प्रकल्प (Irrigation Project) गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा रस्ता बंद झालेला आहे. हे जुने रस्ते पूर्ववत चालू करून द्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी (Farmers) 29 मे पासून धरणाच्या भिंतीवरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी संग्रामपूर तहसीलदारांना निवेदन दिले असून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

आदर्श ग्राम वकाना येथील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांची भिलखेड शिवारात शेती आहे. ग्राम वकाना, काकोडा गावाला जोडणारा जुना कच्चा रस्ता (Road) हा वहिवाटीसाठी होता. आज प्रकल्पात हा रस्ता पाण्याखाली बुडीत आहे. नाल्यावर पूल टाकून हा जुना रस्ता पूर्ववत चालू करुन द्यावा व गट नं. ११८, चोंढी शिवार गट नं. ९९,१०० अंतर्गत रस्ते देण्यात यावे.

Farmers Road Chondhi Irrigation Project
'इंदापुरात दुष्काळ स्थिती, खडकवासल्यातून तालुक्याला पाणी सोडा'; आमदार भरणेंची अजितदादांकडे मागणी

तसेच प्रस्तावित, प्रकल्पांच्या डाव्या भिंतीला मुख्य वकाना भिलखेड जोडणारा राजू बाप्पू देशमुख यांचा जुन्या वहिवाटीचा रस्ता श्रीकृष्ण वानखडे यांच्या शेतातून जाणारा जो फक्त लिप्ते यांच्या २० गुंठे शेतातील अधिग्रहण, खरेदी न केल्याने रस्ता अडथळ्यात आहे. तो सुरळीत करून देण्यात यावा. वकाना रहिवासी शेतकरी यांना जवळचा रस्ता मोकळा करून द्यावा, जेणे करून आम्हाला या वर्षी शेताची पेरणी करता येईल, अशी मागणी केली आहे.

Farmers Road Chondhi Irrigation Project
'..तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कृष्णा-पंचगंगेच्या पाण्याने अंघोळ घालणार'; माजी खासदाराने दिला थेट इशारा

एक वर्षांपासून आम्ही निवेदन देत आहोत. परंतु, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काहीही दखल घेतली नाही. त्यामुळे २९ मे पासून प्रकल्पाच्या भिंतीवर उपोषण सुरु करण्यात आले आहे. यात ओम प्रकाश रहाटे, गजानन बनकर, वासुदेव निमकर्डे, गणेश निमकर्डे, समाधान गिहे, ज्योती बनकर, संगीता बनकर, कल्पना बनकर, शुभम रहाटे, फलावंताबाई निमकर्डे, सत्यदेव निमकर्डे, निर्मला निमकर्डे, विमल निमकर्डे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.