Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Green Chilli Prices Drop : अंबाडा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात मिरचीला कमी भाव मिळत असल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. उत्पादनाच्या खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.
Green Chilli Prices Drop
Green Chilli Prices Drop esakal
Updated on

अंबाडा : अंबाडा परिसरात अनेक शेतकरी हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतात. या परिसरात अगदी आठ किलोमीटरवर हिरव्या मिरचीचे मार्केट आहे. येथून अनेक राज्यात मिरच्या विकल्या जातात. सुरवातीला मोठ्या प्रमाणात भाव मिळाले. परंतु आता बाजारात मिरचीला भाव मिळत नसल्याने हिरव्या मिर्चीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.