लाखनी(जि. भंडारा) : नातेवाइकांनी बळकाविलेली शेती परत मिळावी या मागणीसाठी सातत्याने संघर्ष करून थकलेल्या एका उच्चशिक्षित पण बेरोजगार असलेल्या शेतकऱ्याने गोंडसावरी (ता.लाखनी) येथील तलाठ्याला रजिस्टर्ड पोस्टाद्वारे निर्वाणीच्या पत्रासह चक्क विष पाठविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. विधानकुमार मेश्राम असे त्याचे नाव आहे. तो मूळचा खेडेपार येथील रहिवासी असून सध्या कोंढी (जवाहरनगर) येथे वास्तव्यास आहे.
शासकीय कार्यालयात सहसा कोणत्याही लिफाफ्यातून एखादे सरकारी पत्र, आदेश व तक्रारीचा मजकुर पाठविला जातो. परंतु, विधानकुमार यांनी रजिस्टर्ड पोस्टाद्वारे पत्रासह तलाठ्याला विष पाठवून आपला संताप व्यक्त केला. गोंडसावरी येथे रूपेश रामटेके यांच्याकडे तलाठीपदाचा कार्यभार आहे. गोंडसावरी अंतर्गत खेडेपार गावाचा तलाठी साज्याचा समावेश आहे. त्यांना रजिस्ट्रीद्वारे हा लिफाफा प्राप्त झाला. त्यांनी सहजपणे एखादे दस्तऐवज वा काही मजकुर असलेले पत्र असेल असे म्हणून लिफाफा फोडला. अन त्या लिफाफ्यामधून चक्क सिलफॉस नामक कीटकनाशकाचे पुडी असलेले विष बाहेर पडले. अशा प्रकारचे पत्र पाहून त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. विशेष म्हणजे या लिफाफ्यात कोणतेही पत्र वा मजुकर असल्याचा उलगडा त्यांनी केला नाही. त्यामुळे या पत्राचा काय अर्थ लावावा असा, प्रश्न त्यांना पडला आहे.
विधानकुमार मेश्राम याने ही रजिस्टर्ड पोस्ट केली आहे. ही व्यक्ती एम.ए.(मराठी), बी.एड. असून उच्चशिक्षित असल्याचे लिफाफ्यावर लावलेल्या ठशावरुन दिसून येते. याबाबत अधिक माहिती घेतली असता, विधानकुमार हे मूळचे खेडेपार येथील असून सध्या ते कोंढी(जवाहरनगर) येथे वास्तव्यास आहेत. पूर्वी सडक(अर्जुनी) येथे ते स्टॅम्प व्हेन्डरचा व्यवसाय करायचे. पण प्रकृतीमुळे तोही बंद पडला. बेरोजगार असल्याने कुटुंबाच्या प्रपंचाचा प्रश्न समोर आहे. मुलगा स्वप्नील हा पदवीचे शिक्षण घेत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. पत्नी व मुलगा मोलमजुरी करून घराचा गाडा कसातरी चालवितात. त्यामुळे मुलगा स्वप्नील याने गावाकडील शेतीबाबत वडील विधानकुमार यांच्याकडे तगादा लावला. परंतु,
ओलित शेतीच्या जागी पडीक शेती देण्यात आल्याने त्यावरही पाणी पडले.
खेडेपार येथे माझी साडेतीन एकर वडिलोपार्जित शेती आहे. पोटापाण्यासाठी मी गाव सोडले. दरम्यान माझ्याच काही नातेवाइकांनी तत्कालीन तलाठ्याला हाताशी धरून सिंचनाची सोय असलेल्या ओलित शेतीचा सातबारा आपल्या नावावर करून घेतला. खडकाळ व उपजाऊ नसणारी शेती माझ्या वाट्याला आल्याचे दिसून आले. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही काहीच झाले नाही. त्यामुळे यापुढेही न्याय न मिळाल्यास मी पत्राद्वारे पाठविलेले हेच विष प्राशन करीन असे पत्र तलाठ्याला पाठविले आहे.
-विधानकुमार मेश्राम, अन्यायग्रस्त शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.