Crime News : मोबाईल रिचार्ज करायला गेले ते परत आलेच नाही; वडिलांचा सापडला रक्ताळलेला मृतदेह

बाजार करून मुले घरी परतले असता, त्यांना घरी वडील दिसले नाही.
Crime News : मोबाईल रिचार्ज करायला गेले ते परत आलेच नाही; वडिलांचा सापडला रक्ताळलेला मृतदेह
Updated on

तळेगाव (श्या.पं.) (जि. वर्धा) - मोबाईलचा रिचार्ज करण्याकरिता बाहेर पडलेले वडील रात्री उशिरापर्यंत परत आले नाही. मुलांनी शोध घेतला असता नजीक असलेल्या भारसवाडाकडे जाणाऱ्या मार्गावर त्यांना त्यांच्या वडिलांचा रक्ताळलेला मृतदेह सापडला. बाबाराव महादेव पारिसे (वय ५५) असे मृताचे नाव असून ते अमरावती जिल्ह्यातील नमस्कारी (ता. तिवसा) येथील रहिवासी आहेत.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नमस्कारी हे गाव वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भारसवाड्याच्या नजीक आहे. सोमवारी भारसवाडा येथील बाजार असतो. नमस्कारीचे गावकरी या बाजारात येत असतात. या बाजाराला बाबाराव पारिसे यांची मुले गेली होती.

बाजार करून मुले घरी परतले असता, त्यांना घरी वडील दिसले नाही. त्यांनी आईला याबाबत विचारणा केली. ते मोबाईल रिचार्ज करण्याकरिता गेले असल्याचे तिने सांगितले. बराच वेळ झाल्याने बाबाराव घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने व मुलांनी शोध घेतला.

बाबाराव यांचा मुलगा व एक नातेवाईक असे दोघेजण त्यांना शोधत पायवाटेने भारसवाडा येथे जात असताना मुलाला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यावेळी बाबाराव यांच्या कपाळावर गालावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने मारले असल्याचे आढळून आले. तत्काळ याची माहिती तळेगाव पोलिसांना देण्यात आली.

तळेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप धोबे व पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासासाठी पाठवला आहे. पोलिस यंत्रणा आरोपीच्या शोधात असून या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com