Hingana Crime: स्वतःच्या लहान मुलींवरच गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या व मोठ्या मुलीवरसुद्धा प्रयत्न करून तिचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नराधम बाप छातीत दुखत असल्याने रुग्णालयात भरती आहे.
त्यामुळे त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना एका झोपडपट्टीत घडली. पीडिता ही १५ वर्षीय अल्पवयीन आहे. तिला एक मोठी बहीण( वय १७) सुद्धा आहे. आई कामाला व मोठी बहीण शिक्षणाकरिता बाहेर गेली की आरोपी त्या मुलीवर बलात्कार करायचा. कुणाला सांगितले तर मारण्याची भीती दाखवत होता.
मागील पाच सहा वर्षांपासून हा नराधम बाप तिचे लैंगिक शोषण करीत होता. शनिवारी (ता.६) तिची मोठी बहीण एकटीच घरी होती. त्यामुळे या बापाच्या अंगातील सैतान पुन्हा जागा झाला. त्याने तिलाही जवळ ओढून तिच्यावर सुद्धा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याच्या तावडीतून सुटका करून घराबाहेर पळ काढला. हा प्रकार सुरवातीला तिने रडत रडत लहान बहिणीला सांगितला तर लहान बहिणीने तिला आपबिती हकिकत सांगितली. त्यानंतर त्या दोघीही बहिणी थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात आल्या आणि पोलिसांना ही सर्व हकीकत सांगितली.
ठाणेदार प्रवीण काळे यांनी तत्काळ मुलीच्या घरी पोलिस अधिकाऱ्यांना त्या नराधम बापाला ताब्यात घेण्यासाठी पाठवले. मात्र आरोपी स्वतः छातीत दुखत असल्याचे सांगत एका रुग्णालयात उपचारासाठी भरती झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याच्या रुग्णालयातून बाहेर पडण्याची वाट बघत आहेत. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.