वर्धा : रोठा शेतशिवारातील तलावाच्या चेंबर विहिरीत सापडलेल्या वसंता हातमोडे यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपींना अटक केली. ही हत्या तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात होणाले बयाण आणि पैशाच्या वादातून झाल्याचे पुढे आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राजकिय वलय असलेले कामगार नेते भास्कर दादाराव इथापे (वय 59) रा. सिंदी (मेघे), विलास मून (वय 55) रा. वर्धा, दिलीप नारायण लोखंडे (वय 61) रा. नागठाणा या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी गुन्हा कबुल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रशांक होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालोती येथील वसंता हातमोडे पाच तारखेला सकाळी 9.45 वाजताच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले होते. ते घरी परतले नसल्याने मुलगा नीलेश हातमोडे याच्या तक्रारीवरुन सावंगी पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी रोठा शेतशिवारातील तलावाच्या चेंबर विहिरीत सिमेंटच्या खांबाला बांधून अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेहाला पोल बांधून असल्याने हा सूनियोजीत खून असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाचा मुलगा व मृतकाची पत्नीने दिलेल्या जबाबात जुन्या आर्थिक कारणावरून आणि कोर्ट केस वरून मृताचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी भास्कर इथापे, विलास मून व दिलीप नारायण लोखंडे या तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तीघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, सावंगीचे ठाणेदार बाबासाहेब थोरात व डी.बी. पथक व कार्यरत अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे, गोपाल ढोले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी व सायबर शाखा वर्धा यांनी संयुक्तपणे केली.
फसवणूक प्रकरण ठरले हत्येचे कारण
वसंता हातमोडे व भास्कर इथापे यांच्यावर पुलगाव पोलिसात 2019 मध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची दोन दिवसांनी वर्धा न्यायालयात सूनावनी होती. यात वसंता आपले तोंड उघडेल आणि आपल्याला वसंताबरोबर तुरंगाची हवा खावी लागेल अशी भीती भास्कर इथापेला वाटल्याने त्याने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने सूनियोजीत कट रचून खून केल्याचे तपासात पुढे आले आहे.
घटनास्थळापासून 700 मिटरवर मिळाले पुरावे
विहिरीत मृतबरोबर पोल बांधून आढळून आल्याने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पोलिसांचे चार पथक तयार करण्यात आले. घटनास्थळापासून 700 मिटर अंतरावर मृताला बांधण्यासाठी वापरण्यात आलेला पोल व रोठा येथील फार्महाऊसवर असलेल्या पोलमध्ये साम्य आढळून आले. यातून आरोपीचा सुगावा मिळाला. मृताचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृताच्या मुलासोबत दिली पोलिसात तक्रार
वसंता 5 तारखेपासून बेपत्ता होता. याची तक्रार देण्यासाठी यातील दोन आरोपी हे मृताचा मुलगा नीलेशबरोबर सांवगी पोलिसात वसंता बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी गेले होते, असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.