रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

fertilizers rate increases from march in yavatmal
fertilizers rate increases from march in yavatmale sakal
Updated on

आर्वी (जि. वर्धा) : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. आधीच कोरोनाची झळ सोसत सोसत शेतकरी बेजार झाला आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या नापिकीने त्याची आर्थिकस्थिती दयनीय करून ठेवली आहे. अशात खताच्या वाढीव किंमतीची झळ सोसणे त्याला शक्‍य होणार नाही. केंद्र सरकारने लक्ष देवून भाववाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

fertilizers rate increases from march in yavatmal
पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

गतवर्षी ऐन पीक घरी आणायच्या वेळेवरच धुव्वाधार पावसाने शेत पिकांची मोठी हानी केली. यातच पिकांवर किडींनीसुद्धा आक्रमण केले. शेतकऱ्यांच्या तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावला गेला. खरीप गेला तरी रब्बी पिकात भरपाई निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळीसुद्धा गारपीट व अतिवृष्टीने आपला राग पिकांवर काढला. काहींचा गहू जमीनदोस्त झाला तर ज्याचा पाण्यात सापडला त्याच्या मालाला भाव मिळत नाही. शासनानेसुद्धा काहीच मदत केली नाही. यामुळे शेतकरी पूर्ती आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक कंपन्यांनी पत्रक काढून नवे दर घोषित केले आहे. युरिया वगळता सर्वच सयुक्तिक खतांच्या भावात सुमारे 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. बॅंकेकडून पीककर्ज मिळाले तरी त्यातील जास्तीत जास्त पैसा संयुक्त खताच्या खरेदीमध्ये जाईल. ज्यांच्याजवळ थोडीबहुत शिल्लक आहे, तो बी-बियाण्यांची सोय लावेल. मात्र ज्यांच्याकडे छदमाही नाही. त्याच कस होणार असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. भाव वाढीच्या या जोखडातून शेतकऱ्यांना सोडविण्याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि संयुक्त खताच्या वाढीव किमंती कमी कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

fertilizers rate increases from march in yavatmal
ऑनलाइन प्रेमातून मुलीला मारण्याचा प्रयत्न

47 हजार हेक्‍टर पेरणी, 10 हजार टन खताची मागणी

यंदाच्या खरीप हंगामात 47 हजार 45 हेक्‍टरमध्ये ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमुग, तूर, मूंग, उडीद, तीळ, मका आदी पिकांची पेरणी होण्याची शक्‍यता आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात रासायनिक खत लागणार असून 10 हजार 430 मॅट्रीक टन खताची मागणी नोंदविली आहे. यात डीएपी, एमओपी, एसएसपी, 10.26.26, 14.35.14, 15,15,15, 16.16.16, 19.19.19, 20.20.00, 20.20.00.13, 24.24.00, आदी रासायनिक खतांचा समावेश आहे. खतांचा काळा बाजार होऊ नये, याकडे प्रशासनाचे बारीक लक्ष राहणार आहे, अशी माहिती येथील तालुका कृषी अधिकारी सुप्रिया वायवळ यांनी दिली आहे.

भाव गगणाला, शेती करणे कठीण

सतत निसर्गाची अवकृपा होत असल्याने शेतकरी पूर्णत: खचला आहे. एकीकडे होत असलेली नापिकी तर दुसरीकडे उत्पादित मालाला मिळत नसलेला भाव. यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशात जर रासायनिक खतांचे व बी-बियाण्यांचे भाव गगनाला भिडत असले तर शेती करणे कठीणच आहे. यापेक्षा मोलमजुरी करून जीवन जगणे बेहत्तर ठरेल. असे वाठोडा (निंबोली) येथील शेतकरी प्रदीप खोंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.