यवतमाळ : बचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून विविध कामानिमित्त कर्ज घेतले होते. महिलांनी त्याचे हप्ते नियमित भरले. मागील तीन महिने लॉकडाउन असल्याने रक्कम भरता आली नाही. मे महिन्याच्या अखेरपासून मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली सुरू केली. त्यासाठी कर्मचारी गावागावांत जात आहेत. हाताला काम नसल्याने पैसे भरायचे कुठून, अशी चिंता महिलांना सतावत आहे.
गाव, खेडे, तालुका, जिल्हा अशा प्रत्येक ठिकाणी महिला बचत गट तयार करण्यात आले आहेत. असे एकही गाव शोधून सापडणार नाहीत, जिथे बचतगट नसेल. कर्ज घेण्यासह परतफेड करण्यात महिलांनी विश्वास संपादित केला आहे. त्यामुळे महिला बचतगटांना कर्ज देण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या सरसावल्या आहेत. या कंपन्यांनी महिलांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले. जिल्ह्यात कर्ज वाटप करणाऱ्या 12 ते 15 कंपन्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांतील कंपन्यांनी आपले जाळे विणले. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्याने उद्योगधंदे बंद झाले. महिला व पुरुष कुणाच्याही हाताला काम मिळाले नाही. होती, नव्हती जमा पुंजी तीन महिने बसून खाण्यात खर्च झाली. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी मजुरांच्या हाताला काम नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपन्या वसुलीसाठी बचत गटाच्या महिलांशी संपर्क साधत आहेत. शहरी भागात बऱ्यापैकी वसुली जमा होत आहे. मात्र, ग्रामीण भागातील महिला सर्वाधिक चिंतित आहेत. आता वेळेवर कर्जाचे हप्ते न भरल्यास पुढे कर्ज मिळण्यास अडचण जाईल, असे कर्मचारी सांगत आहेत.
ठरलेल्या दिवशी कर्मचारी बचत गटांच्या महिलांची मीटिंग घेतात. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थित राहते. जागेच्या अभावामुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. या मिटिंगमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशांचे पालन केले जात आहे. कर्ज वसुलीसाठी कुणावरही दबाव टाकला जात नाही. सक्ती केली जात नाही. ज्या महिलांकडे पैसे आहेत. त्या भरणा करीत आहेत. इतर महिलांना मुभा दिली जात आहे. नव्याने कर्ज वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.
कोणत्याही प्रकारची वसुली बेकायदेशीर
आरबीआयने येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सवड दिली आहे. या काळात कोणत्याही प्रकारची वसुली करणे बेकायदेशीर आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी रात्री-अपरात्री वसुलीसाठी जात असतील. कुणाला नोटीस देत असतील, अशा लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. कंपन्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.
- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.