गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील धानोरी येथे आयोजित ग्रामसभेत गावातील अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. तसेच निर्णयाचे उल्लंघन करून दारूविक्री करताना आढळून असल्यास संबंधित विक्रेत्याकडून ५० हजारांचा दंड ठोठावण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला.
धानोरी येथे अवैध दारूविक्री होत असल्याने दारूविक्रीची समस्या गावाच्या विकासात आडकाठी निर्माण करत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत दारूविक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी मुक्तिपथ तालुका चमूने दारूविक्रीचे नुकसान ग्रामस्थांना पटवून दिले. त्यानंतर सर्वानुमते गावात दारूविक्री नको, असे गावकऱ्यांनी ठरविले. त्यासाठी दारूबंदीचा ठराव पारित करून पुन्हा गावात दारूविक्री करताना आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांना ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे कागदपत्र बंद तसेच ५० हजारांचा दंड देखील वसूल करण्याचा ठरविण्यात आले.
दरम्यान, निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दारूबंदी संघटना गठीत करण्यात आली. तसेच मुक्तिपथ शक्तिपथ स्त्री संघटनादेखील गठीत करण्यात आली. ही ग्रामसभा माधव धुर्वे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेला सरपंच मीनाक्षी गेडाम, ग्रामसेविका प्रज्ञा फुलझेले, उपसरपंच सीमा मोहुर्ले, संदीप नैताम, पोलिस पाटील प्रमोद तुलावी,
गोपाल बनसोड, निळू कल्लो, केवळराम मांदाळे, संदीप तुलावी, उमाजी तुलावी, कमल गुरनुले, कविता सयाम, उज्ज्वला मेश्राम, प्रेमिला गुरनुले, उषा गुरनुले, मनीषा धुर्वे, संजना मोहुर्ले, देवला धुर्वे, शारदा शिंदे, सुनिता सयाम, यामीना तुलावी, भूमिता मोहुर्ले, मुक्तिपथतर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम व तालुका प्रेरक जीवन दहीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ग्रामीण भागांत महिलाशक्ती अवैध दारूविक्रीच्या विरोधात त्वेषाने लढत आहे. मुक्तिपथच्या शक्तिपथ संघटनेचा प्रभाव सर्वत्र वाढत आहे. गावातील अवैध दारूविक्रेत्यांना दंड सुनावणे, दारूभट्ट्या, मोहसडवा, दारूतस्करांवर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करणे, अशा उपक्रमांच्या माध्यमातून दारूविक्री रोखण्यात बरेच यश मिळताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.