लग्नात गर्दी जमवणे भोवले, वर-वधूंच्या आईवडिलांसह आचाऱ्यांवरही गुन्हा

representative image
representative imagee sakal
Updated on

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील मरकेगाव या ठिकाणी लग्न समारंभाच्या वेळी २५ पेक्षा जास्त व्यक्तींची संख्या आढळून आली. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या स्थानिक कृती समितीने लग्न समारंभातील वधू-वरांच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.

representative image
हृदयद्रावक! उपचाराअभावी कोरोनाग्रस्तानं प्रवासी निवाऱ्यात तडफडून सोडले प्राण; ब्रह्मपुरीतील घटना

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यापूर्वीच गर्दी न करण्याबाबत विविध आदेश निर्गमित केले होते. तसेच कोणत्याही लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास अटकाव घालण्यात आला होता. असे असतानाही मरकेगाव येथे लग्न समारंभात दीडशेपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मास्क न घालणे, शारीरिक अंतराचे पालन न करणे अशा गोष्टी आढळून आल्याने स्थानिक कृती समिती, यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व इतर समिती सदस्य यांनी संबंधित लग्न समारंभातील वधू-वरांचे आई-वडील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस स्टेशनमधून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व जमावबंदी आदेशानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर व वधूचे आई, वडील तसेच आचारी ( केटरर्स ) यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ व आणि महाराष्ट्र कोविड -१९ विनियमन २०२० चे कलम ११ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) ३ १३५ त्याचप्रमाणे भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८, २६०, २७१ नुसार ग्रामसेवकांनी शनिवार (ता. १७) धानोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केल्याचे धानोऱ्याचे तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()