महिनाभराने कामावर रूजू झालेल्या डॉक्टरचा खून; झाडल्या चार गोळ्या

Firing
FiringFiring
Updated on

उमरखेड (जि. यवतमाळ) : येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून (Firing on Doctor) केला. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या हत्याकांडाने उमरखेड शहरासह परिसर ढवळून निघाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. हनुमंत धर्मकारे हे एक महिन्यापासून सुट्टीवर होते. मंगळवारी त्यांनी कामावर रुजू झाल्याची नोंद केली. यानंतर रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चहा टपरीवर चहा घेतला. दुचाकीवर स्वार होत असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर गोळीबार (Firing on Doctor) केला.

Firing
MPSC Exam : परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

चारपैकी एक गोळी छातीवर व तीन गोळ्या पाठीवर लागली. दरम्यान, आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला. डॉ. धर्मकारे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मांडण यांनी दिली. अज्ञात मारेकऱ्याचा शोध पोलिस घेत आहे.

मंगळवारीच झाले होते रुजू

डॉ. धर्मकारे एक महिन्यापासून सुट्टीवर होते. मंगळवारीच ते कामावर रुजू झाले होते. बाल रोगतज्ञ असलेले डॉ. धर्मकारे सात-आठ वर्षांपासून उमरखेड शासकीय रुग्णालयात आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने उमरखेड शहरातील नागरिक शासकीय रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते.

Firing
यूपीमध्ये भाजपला धक्के; आणखी ३ आमदारांनी पक्ष सोडला

नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

शहरात आज योगायोगाने माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आले होते. त्यांना सदर घटनेची माहिती कळताच आमदार नामदेव ससानेसह जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासमवेत शासकीय रुग्णालयाला भेट दिली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातुजी देशमुख, माजी आमदार विजयराव खडसे यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()