यवतमाळ : जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक खर्चासाठी ग्रामपंचायत निवडणूक विभागाने आयोगाकडे निधीचा प्रस्ताव पाठविला आहे. ग्रामीण भागातील निवडणुकीसाठी प्रती ग्रामपंचायत 49 हजार रुपयांची डिमांड केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर गावागावांत भावी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. नेत्यांकडून निवडणूक लढण्याची रणनिती आखली जात आहे. तर दुसरीकडे प्रशासनानेही कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मशिनपासून तर वाहनापर्यंतची सर्व व्यवस्था तयार केली जात आहे. यासाठी साहित्यांची गरज निवडणूक विभागाला आहे. त्यामुळेच निवडणूक विभागाने प्रती ग्रामपंचायत याप्रमाणे निधीची डिमांड केली आहे. जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात निवडणूक असल्याने प्रशासनही सज्ज झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संबंधित विभागाला मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. यासाठी जवळपास पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत निधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. प्रत्येकी वेळी ग्रामपंचायत निवडणूक प्रशासनाला उधारीवर करावी लागते. काही दिवसानंतर संबंधित विभागाला निधी वितरित होतो. मात्र, तोपर्यंत उधारीवरच सर्व काही अवलंबून असते. या टप्प्यात तब्बल 980 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी निधीही लागणार आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या निवडणुकांसाठी निधी येतो की या निवडणुकाही उधारीवर होतात. यावर संबंधित विभागात चर्चा आहे.
समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी -
ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखा जवळ येत आहेत, तसा प्रसाराच्या कामाला गती आली आहे. कमी वेळात जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर नेते, कार्यकर्त्यांकडून होत आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याने सध्या समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकीत प्रचारासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना, बंडखोर, अपक्ष असे सर्वच उमेदवार समाजमाध्यमांचा वापर करतात. गेल्या काही काळात समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही समाजमाध्यमांचा वापर करायला सुरुवात झाली आहे. काही पॅनेलकडून व्हिडिओ तयार करून आतापासूनच अपलोड करणे सुरू आहे. त्याचा कितपत प्रभाव मतदारांवर पडणार, हे वेळच ठरविणार असली तरी उमेदवार "स्मार्ट'प्रचारात गुंतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.