महाराष्ट्राला हादरवणारी घटना; मेळघाट प्रकल्पातील महिला अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Forest Range Officer of Sipna Wildlife Department of Harisal Tiger Project has committed suicide by shooting himself.jpg
Forest Range Officer of Sipna Wildlife Department of Harisal Tiger Project has committed suicide by shooting himself.jpg
Updated on

धारणी (अमरावती)  : हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी 7 वाजता हरिसाल येथील सरकारी बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्याचे कारण आणखीन स्पष्ट झाले नाही.
 
धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यातील तपशील कळू शकला नाही. चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती धारणीचे पोलिस निरीक्षक शुभम कुलकर्णी यांनी सांगितले. तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपाली चव्हाण यांचे पती अमरावतीला अन्य विभागात कार्यरत आहेत. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज वर्तविला जातो आहे. 

मिळालेल्या माहितीप्रमाणे, दिपाली यांना एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले होते. त्यावेळी दिपाली यांना त्यांनी झापल्याची माहिती समोर आली आहे. मृतकाच्या घरी घटनेच्या वेळी कोणीच नव्हते, असे समजले आहे. पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणाने वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.