वनरक्षकाच्या कार्यासोबतच गोसंवर्धनाचा छंद; पशुपालनासंदर्भात प्रयोग

वनरक्षकाच्या कार्यासोबतच गोसंवर्धनाचा छंद; पशुपालनासंदर्भात प्रयोग
Updated on

गडचिरोली : वनविभागातील अधिकाऱ्यांना निसर्ग रक्षणासाठीच्या विविध कार्याची आवड असते. परंतु, गडचिरोली वनविभागाचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना विविध वनांचा अभ्यास, संशोधन, रक्षण यातील आवडींसह गोपालनाचाही छंद आहे. यातूनच त्यांनी गोपालनाचे विविध प्रयोग केले आहेत.

गडचिरोलीचे वनसंरक्षक असलेले डॉ. किशोर मानकर मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. मानकर यांना शेतीकामासह पशुपालनाचे बाळकडू वडील व मोठ्या भावाकडून मिळाले. कृषी महाविद्यालय येथून पदवीधर, दिल्लीतील नामांकित भारतीय कृषी अनुसंधान संस्थेतून एमएस्सी व पीएचडी असा दहा वर्षे कृषीशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे.

वनरक्षकाच्या कार्यासोबतच गोसंवर्धनाचा छंद; पशुपालनासंदर्भात प्रयोग
बायकोशी भांडण झाल्याने महेशची आत्महत्या; हा पोलिसांचा नीचपणाचा कळस

डॉ. मानकर यांचे मोठे भाऊ आनंदराव मानकर यांच्या शेतावर अनेक गायी आहेत. भावाने जास्त दूध देणाऱ्या देशी गायींचे पालन करावे, या उद्देशाने डॉ. मानकर यांनी नागपूर जवळच्या बुट्टीबोरी येथे स्थायिक असलेल्या काठेवाडी लोकांकडून गीर प्रजातीच्या गायी घेण्यास भावाला सांगितले. या गायीचे त्यांनी काळजीपूर्वक व उत्कृष्ट पद्धतीने संगोपन केल्यामुळे ही गाय दिवसाला ८ ते १२ लीटर दूध सहज द्यायची. या गायीवरील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गोधनात सुधारणा व्हावी, या उद्देशाने त्यांनी थेट गुजरात येथील जामनगर येथून गीर प्रजातीचा वळू आणण्यासाठी भावाला मदत केली.

पारंपरिक पद्धतीने घरातून मिळालेल्या गोपालनाच्या ज्ञानाला पशुसंगोपनावरील विविध ग्रंथ, यू ट्यूबवरील व्हिडिओ व इतर मित्र तज्ज्ञांशी चर्चा अशी जोड देत त्यांनी व्यासंग वृद्धिगंत केला. वनविभागातील नोकरी सांभाळत असताना गोपालनाला फारसा वेळ मिळत नसला, तरी ते मोठ्या बंधूकडे असलेल्या गायींची जमेल तशी काळजी घेतात. सध्या त्यांच्या भावाकडे १६ देशी गायी आहेत. शेतकऱ्यांनी देशी गोवंशाचे उत्तम प्रकारे पालन करून भरघोस उत्पन्न कसे मिळवावे, यावरही ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात.

वनरक्षकाच्या कार्यासोबतच गोसंवर्धनाचा छंद; पशुपालनासंदर्भात प्रयोग
पती म्हणाला, माझ्याकडून मुलं होऊ शकत नाही; परपुरुषासोबत संबंध ठेव
देशी गायीचे दूध ए २ प्रकारचे असल्याने आरोग्यास अतिशय पोषक आहे. म्हणून अलीकडे देशी गायीच्या दुधाची मागणी वाढत चालली आहे. ब्राझिलसारख्या देशांनी भारतातीलच गीर गायींचे पालन करून अर्थव्यवस्था सुदृढ केली आहे. आपल्याकडील शेतकऱ्यांनीही शास्त्रोक्त पद्धतीने गीर, साहिवाल, गौळाऊ, थारपारकर आदी देशी गोवंशाचे पालन करावे. त्यातून शेतकरी समृद्ध होण्यासह कृषी व्यवस्था मजबूत होईल.
- डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक, वनविभाग, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.