गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात परिणय फुके सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशात हा अपघात आहे की घातपात याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात त्यांच्या ताफ्यातील एका कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. सुदैवाने डॉ. फुके या अपघातात बचावले आहेत.
डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परतत असताना रात्री दोन वाजताच्या सुमारास साकोलीजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.
साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले पण त्यांच्या चालकाने सतर्कता दाखवली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले.
भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.