अमरावती - भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना रजिस्टर डाकेने प्राप्त झालेल्या एका पत्रातून धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने त्यांना दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी राजापेठ ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध आज शुक्रवारी (ता. ११ ऑक्टो.) रात्री गुन्हा दाखल झाला.
नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. धमकीचे पत्र रजिस्टर डाकेने आज शुक्रवारी दुपारी राणा यांच्या शंकरनगरस्थित निवासस्थानी प्राप्त झाले. रजिस्टर स्पीड पोस्टाने प्राप्त झालेले हे पत्र हैदराबाद येथून आमिर नामक व्यक्तीने पाठविले. त्यात पत्रात माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे.
सदर पत्रामध्ये धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात मजकूर लिहिला आहे. पत्रामध्ये धमकी देणाऱ्याने राणा यांची सुपारी घेतली असल्याचाही उल्लेख करण्यात आला. यातून वाचायचे असल्यास दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.अमीर नामक अनोळखी व्यक्तीवर तातडीने कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केली आहे.
प्राप्त तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी सदर अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.