टूरच्या नावाने सव्वादोन लाखांनी फसवणूक; पोलिसांत तक्रार

टूरच्या नावाने सव्वादोन लाखांनी फसवणूक; पोलिसांत तक्रार
Updated on

अमरावती : टूर पॅकेजच्या (Tour package) नावाने एका व्यक्तीची तब्बल २ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक (Cheating) करण्यात आली. परीक्षित अरुण भांबूरकर (वय ३३, रा. बियाणी चौक) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Fraud of Rs 12 lakh in the name of tour)

वर्षभरापूर्वी भांबूरकर यांची सोशल मीडियावरून येरवडा, पुणे येथील अनिकेत नितीन दामले यांच्यासोबत ओळख झाली. दामले हे वारंवार टूर पॅकेज संदर्भातील माहिती असलेले मॅसेज भांबूरकर यांना सोशल मीडियावरून पाठवीत होते. त्यापैकी गोवा टूर पॅकेज पसंत आल्यामुळे भांबूरकर यांनी खताच्या कंपनीचे डिलर असलेल्या १५ व्यक्तींना या सुविधेचा लाभ देण्याचे ठरविले. त्याकरिता परीक्षित यांनी दामले यांच्या कंपनीसोबत करार केला व त्यानुसार २ लाख २२ हजार रुपये दामले यांच्या कंपनीला पाठविले.

टूरच्या नावाने सव्वादोन लाखांनी फसवणूक; पोलिसांत तक्रार
रक्त पातळ करणारे इंजेक्शन संपले, तरीही प्रिक्स्रिप्शनवर लिहून देण्यास डॉक्टरांची टाळाटाळ

मात्र, पॅकेजमध्ये इंडिगो एअरलाइन्सचे तिकीट कन्फर्मेशन व हॉटेल बुकिंगची सुविधा दिली नाही. शिवाय तिकीटेसुद्धा संबंधितांकडून मिळाली नाहीत. संपर्क साधला असता ७ जानेवारी २०२१ पासून अनिकेत दामले यांचा भ्रमणध्वनी बंद आहे, असा भांबूकर यांचा आरोप आहे. दामले यांनी टूरचे तिकीट किंवा पैसे परत न करता फसवणूक केली, असा आरोप भांबूरकर यांनी तक्रारीत केला. पोलिसांनी दामलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुरुवारपर्यंत (ता. सहा) कुणालाही अटक झाली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्यापाऱ्याकडून लुबाडले

शहरात व्यापाऱ्याच्या फसवणुकीची आणखी एक घटना घडली. अब्दुल फैजान अहमद नसीम (वय २६) हे कापड व्यापारी आहेत. त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून स्वत: कापडाचे ठोक व्यापारी असल्याची बतावणी केली. त्यासाठी मालाची ऑर्डर नोंदवून अब्दुल फैजान यांना ४९ हजार ४०० रुपये खात्यावर ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. परंतु निर्धारित वेळेत कापडाचा माल पाठविला नाही. अब्दुल फैजान यांनी सायबर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी तोतयाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

(Fraud of Rs 12 lakh in the name of tour)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()