जिवाभावाच्या मित्रानंच केली ऑनलाइन फसवणूक; घातला तब्बल ६१ हजारांचा गंडा 

Friend did fraud with Man in Wardha
Friend did fraud with Man in Wardha
Updated on

वर्धा : मित्राचे सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून तब्बल 61 हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या विश्‍वासघातकी मित्राला पोलिसांनी अकोला येथून अटक केली आहे राजेंद्र मराठे रा. पातूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तक्रारदाराच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन खरेदी केलेले सर्वच साहित्य जप्त केले आहे.

दिल्ली येथील राहुल मोरणकर हे त्यांच्या वर्ध्यातील गोजी या मुळगावी लग्न समारंभाकरिता आले होते. त्यांचे लग्न नागपूर येथे होते. या दरम्यान त्यांच्याकडून रोख 3 हजार रुपये, सात हजार रुपयांची एक हातघड्याळ तसेच त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ऑनलाइन 49 हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. याच वेळी एक रिलायन्स जिओ कंपनीच्या सिमाकार्डवर वर्षभराचा रिचार्ज करून मोरणकर यांची 61 हजार 500 रुपयांनी फसवणूक केली. राहुल मोरणकर यांनी दोन दिवसांनी अकाउंट तपासल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सेवाग्राम पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल वर्धा तर्फे करण्यात आला. आरोपीने फिर्यादीच्या नकळत त्यांचे सीम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून ऑनलाइन खरेदी केली. तसेच संशय येऊ नये म्हणून डिलिव्हरी ऍड्रेस भारती विद्यापीठ पुणे असा दाखविला. तांत्रिक पद्धतीने गुन्ह्याचा तपास केला असता गुन्ह्यातील आरोपी हा तालुका पातूर, जिल्हा अकोला येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

यावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून चोरी आणि खरेदी केलेला सर्वच मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, गजानन लामसे, दिनेश बोथकर, मनीष कांबळे, नवनाथ मुंडे यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.