- अविनाश साबापुरे
यवतमाळ - परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बोगस अपंगत्व प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत आहे. त्याचवेळी आता राज्यात चपराशापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २७० जणांचे अपंगत्व प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या सर्वांची कुंडली खुद्द आमदार बच्चू कडू यांनी गोळा केली असून ती दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या हाती कारवाईसाठी सोपविली आहे.