वर्धा : पेट्रोलियम कंपन्यांनी गत आठवड्यात अचानक पेट्रोलमध्ये ५० पैशांची दरवाढ केली. या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावली आहे. शनिवारी (ता. ३०) पेट्रोलचे दर ९३.३४ रुपये प्रती लिटर होते. या दरावरून पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याचे संकेत आहेत.
सध्या रोज किमती बदलत असल्यामुळे रोज किमान १० ते ५० पैशांची वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलमध्ये महिन्याला सरासरी एक रुपया दरवाढ होत आहे. गत वर्षभरात तब्बल १२ रुपयांनी डिझेल व पेट्रोलची प्रतिलिटर किंमत वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे केवळ वाहनचालकच नाही तर इतर क्षेत्रातील उत्पादन व सेवांची दर वाढ गगनाला भिडली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे जिणे खडतर बनत चालले आहे.
गत वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबर रोजी पेट्रोलचा दर ९०.५३ रुपये प्रतिलिटर होता. तर तो सध्या ९३.३४ रुपये इतका झाला आहे. पंधरा दिवसांत लिटरमागे एक रुपया २६ पैशांनी दरवाढ झाली आहे. तसेच डिझेलमध्ये पंधरा दिवसांत तब्बल सव्वा रुपयाची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने त्याचा परिणाम भारतातील किरकोळ इंधन दरवाढीत होत आहे. २०१८ मध्ये डिझेलचे दर ६६.४० रुपये इतके होते. याचाच अर्थ गत दोन वर्षांत १५ रुपयांची दरवाढ झाली आहे.
डिझेलवर एका लिटरला ३० ते ४० रुपये कर द्यावा लागत असल्याने इंधनात वाढ होत आहे. पेट्रोलच्या बाबतीतही अशीच स्थिती असून गत दोन वर्षांत पेट्रोलच्या दरात सरासरी १२ रुपयांची वाढ झाली आहे.
गत वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर ८१ ते ८४ रुपये पर्यंत दोलायमान स्थितीत होते. मात्र, शेवटच्या तिमाहीत पेट्रोलच्या दरांत कमालीची वाढ होत गेली. गत वर्षी १ जानेवारीमध्ये पेट्रोलचा दर ८०.९१ रुपये तर ३० जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचा दर ९३.३४ रुपये लिटर इतका झाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन तेल विपणन कंपण्या सकाळी ६ नंतर पेट्रोल, डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरासाठी आपण वेबसाईटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसेच मोबाईल फोनवर एसएमएस द्वारेही दर तपासता येतात.
तेल पुरवठादार देशाची संघटना ओपेकच्या बैठकीनंतर जागतिक तेल बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये थोडी वाढ झाली. पूर्वी ५० डॉलर्स प्रतिबॅरल असलेली क्रूडची किंमत आता ५६ डॉलर प्रतिबॅरल अशी झाली आहे. तरी देखील देशात नागरिकांना ज्या किंमतीत पेट्रोल मिळत आहे ती किंमत अधिक आहे. याचे कारण पेट्रोलवरील कर असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. पेट्रोलवर जवळपास १३० टक्के कर लागतो. त्यामुळेच क्रूड ऑईल स्वस्त असतानाही पेट्रोल दर मात्र भडकलेले आहेत.
महिना | पेट्रोल | डिझेलचे दर (रुपयात) |
जानेवारी 2020 | 80 .91 | 68.76 |
जून 2020 | 83.53 | 72.47 |
सप्टेंबर 2020 | 88.68 | 78.32 |
डिसेंबर 2020 | 88.21 | 76.16 |
30 जानेवारी 2021 | 93.34 | 82.54 |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.