Gadchiroli Students Poisoned : गडचिरोली विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची संख्या १०९ वर; आश्रमशाळेत स्वयंपाक बनविताना निष्काळजीपणा भोवला

बुधवारी १०६ विद्यार्थिनींना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Gadchiroli 109 students hospitalized after food poisoning girls hostel in ashram school
Gadchiroli 109 students hospitalized after food poisoning girls hostel in ashram school
Updated on

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे गावातीप शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना बुधवारी विषबाधा झाली होती. गुरुवार (ता. २१) बाधित विद्यार्थिनींची संख्या वाढून १०९ वर पोहोचली आहे. सकाळी नाश्ता केल्यानंतर पुन्हा काही विद्यार्थिंनींना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी १०६ विद्यार्थिनींना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची संख्या १०९ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे बुधवार व गुरुवार मिळून तब्बल ४० विद्यार्थिनींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सोडे गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे.

२० डिसेंबरला दुपारच्या जेवणात विद्यार्थिनींना कोबी, वरण, भात व गाजर देण्यात आले होते. जेवल्यानंतर काही विद्यार्थिनींना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ४८ तास या सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबरला सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना नाश्त्यात वाटाण्याची उसळ दिली होती. ती खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना मळमळ, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४० विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून उर्वरित विद्यार्थिनींवर धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने आश्रमशाळेत स्वयंपाक बनविताना निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे काही अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात असून त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

Gadchiroli 109 students hospitalized after food poisoning girls hostel in ashram school
Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी, खरगे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार का? काँग्रेसने दिलं उत्तर

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली भेट

अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आदिवासी विकास विभागातर्फे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाह्यसंपर्क) डॉ. बागराज धुर्वे यांनी धानोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथे दाखल मुलींची चौकशी व तपासणी केली. जिल्हाधिकारी संजय मीणा व प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांनीही जिल्हा रुग्णालयास भेट दिली.

Gadchiroli 109 students hospitalized after food poisoning girls hostel in ashram school
Corona JN.1 Variant : कोरोनाच्या नव्या अवताराची राज्यात दहशत; सिंधुदुर्गनंतर कोल्हापुरात आढळला कोरोनाबाधित रुग्‍ण

चौकशीचे आदेश....

२० डिसेंबरला अन्न नमुने तपासणीसाठी घेतले होते, २१ रोजी पुन्हा काही जणांना विषबाधा झाल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील स्वयंपाकघरात भेट दिली. यावेळी तेथील वाटाण्याच्या उसळीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. हे नमुने नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र बाधित विद्यार्थिनींची संख्या १२९ वर असल्याचे बोलले जात आहे.

सर्व दाखल मुलींच्या व सोबतच्या नातेवाइकांच्या आहाराची व संदर्भ सेवेची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य यंत्रणा चौकस आहे. - डॉ. सतीशकुमार सोळंके,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक गडचिरोली

सर्व मुली ८ ते १८ वर्षे वयोगटातील असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज सकाळपर्यंत एकूण १०९ मुलींना विषबाधा झाल्याने ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून ६९ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. - डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक , गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()