Gadchiroli Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २० वर्षांचा कारावास

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
minor girl molestation
minor girl molestationsakal
Updated on

गडचिरोली - घराशेजारच्या बाथरूममध्ये जाऊन घराकडे परत येत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अनिल कवडू मशाखेत्री (वय ४०) रा. दर्शनीमाल, असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दर्शनीमाल गावात ३० मे २०१८ रोजी पीडित मुलगी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घराशेजारी असलेल्या बाथरूममध्ये जाऊन घरी परत येत असताना तिच्या आजोबांच्या घराजवळ असलेल्या गोठ्यात आरोपी अनिल मशाखेत्री लपून बसला होता.

त्याने पीडीतेचा हात पकडून आणि दुसऱ्या हाताने तिचे तोंड दाबून घराच्या धाब्यावर ओढत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडिता बेशुद्ध झाल्याने आरोपीने तिला गोठ्याजवळ असलेल्या शौचालयात डांबून ठेवले. ती घरी न आल्याने कुटुंबातील सदस्या तिला शोधत होते. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान लहान मुलगा सायकल ठेवण्यासाठी घराजवळ असलेल्या गोठ्यामध्ये गेला असता.

गोठ्याजवळ असलेल्या शौचालयात त्याला पीडीतेची पांढऱ्या रंगाची ओढणी दरवाजातून बाहेर दिसली. त्यानंतर कुटुंबीयांना तिथे पीडिता बेशुद्ध अवस्थेत मिळाली.यासंदर्भात गडचिरोली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आरोपीला ३१ मे २०१८ रोजी अटक केली. न्यायालयात स्पेशल केस क्र. २८/२०१८ अन्वये दोषारोप दाखल करण्यात आले.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी आरोपी अनिल मशाखेत्रीला २० वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलिस उपनिरीक्षक तेजस्वीनी पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.