गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मलेरीयाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असून मलेरिया निर्मूलन योजना आखण्यासाठी दिल्लीहून तज्ज्ञांचा चमू गडचिरोलीत दाखल झाली आहे. भारतात सर्वांत अधिक मलेरियाग्रस्त जिल्ह्यांपैकी एक गडचिरोली जिल्हा आहे..विशेषत: भामरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची हे तालुके सोबतच कुरखेडा व अहेरी या सहा आदिवासी तालुक्यांमधे मलेरिया अधिक प्रमाणात आहे. २०१५-१६ नंतर या वर्षी जिल्ह्यामध्ये परत मलेरिया मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील मलेरिया उन्मुलनासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन केला असून टास्क फोर्सला जिल्ह्यासाठी तीन वर्षांची योजना आखण्यास सांगितले आहे. .त्यानुसार योजना आखण्यासाठी दिल्लीहून वरीष्ठ मलेरिया निर्मूलन तज्ज्ञांची एक चमू डॉ. नीरज धिंग्रा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पोचली आहे. डॉ. धिंग्रा हे भारत सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टरबोर्न डिसीज कंट्रोल (NCVBDC) चे पूर्व संचालक असून जागतिक आरोग्य संघटनेचेही तज्ज्ञ सल्लागार राहिले आहेत..त्यांच्यासोबत डॉ. मित्तल व डॉ. निधी पौराणिक हे तज्ज्ञ आहेत. ही चमू डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करेल. जिल्हा परीदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. हेमके तसेच सर्चमधील तज्ज्ञ यांच्या सोबत सल्लामसलत करून ही टीम जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देईल. या सर्वांनी मिळून आखलेली मलेरिया निर्मूलन योजना ही प्रथम टास्क फोर्सला व मग महाराष्ट्र शासनाला सादर केली जाईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.