गडचिरोली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला असून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीतील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा टास्क फोर्सला दिले आहेत. तसेच नागरिकांनी ही संचारबंदी कडक स्वरूपात पाळून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.
जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्यांनी याबाबत विविध विभागांना संचारबंदी यशस्वी करण्यासाठी सूचना व आदेश दिले. यावेळी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी सिंगला म्हणाले की, संचारबंदीची अंमलबजावणी नागरिकांवर अवलंबून आहे. त्यांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. येणारे पंधरा दिवस जिल्ह्यातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत. जर आपण संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसर्ग निश्चितच आटोक्यात आणता येईल. तसे झाले नाही तर भविष्यात पुन्हा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारणे सर्वांनाच त्रासदायक होईल. या संचारबंदीच्या कालावधीत सर्वांनाच त्रास होईल पण आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ याची खात्री आम्हाला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवणे आता गरजेचे आहे. त्या सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतु तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येऊ देवू नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले आहे.
येत्या 1 मे 2021 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात (कंटेनमेंट झोन वगळून) ज्या बाबींना शासन व जिल्हा प्रशासनाचे आदेशानुसार सुरू ठेवण्याची परवानगी अनुज्ञेय असेल ते सुरू ठेवण्याची मुभा असेल तर ज्या बाबींना संपूर्ण क्षेत्रात प्रतिबंध आहे त्यांना पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. राज्यात कलम 144 लागू केले आहे. कोणत्याही वैध कारणांशिवाय किंवा आदेशात अंतर्भूत केलेली परवानगी असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणीही ये-जा करणार नाही. यात वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे आणि त्यांचे व्यवहार व कार्ये अनिर्बंधितपणे चालू असतील.
मैत्रिणीला फिरायला घेऊन जाणं पडलं महाग, तब्बल ६ लाखांचा गंडा
काय असेल सुरु
अत्यावश्यक सेवांमध्ये रुग्णालये, रोग निदान केंद्रे, चिकित्सालये, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, औषध निर्माण कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा, व्हेटर्नरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर सेंटर्स, पेट शॉप्स अंडी, चिकन, मांस तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेले कच्चा माल, गोदामे जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांचे विक्री किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे(दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने(परंतु पान टपरी, पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत).
कोल्स्ड स्टोरेज संबंधित सेवा, सार्वजनिक परिवहन - रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटो रिक्षा व सार्वजनिक बस, भारतीय रिझर्व बॅंकेने विनियमित केलेल्या संस्था आणि स्वतंत्र प्राथमिक विक्रेते, सीसीआयएल, एनपीसीआय, प्रदान प्रणाली कार्यचालक व भारतीय रिझर्व बॅंकेने विनियमित केलेल्या बाजारांमध्ये काम करणारे वित्तीय बाजार भागीदार, यासह मध्यस्थ संस्था, स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सून पूर्व (पावसाळापूर्व) कामे, स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल, दुरुस्तीची कामे, पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा, ई- वाणिज्य (केवळ अत्यावश्यक साहित्यांचे पुरवठासंदर्भात), अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे आदी सुरू राहणार आहेत.
पालकांनो सावधान..! तुमचाही मुलगा मोबाईल गेम खेळत नाही ना?
काय असेल बंद
इलेक्ट्रॉनिक दुकाने, मोबाईल कॉम्प्युटर दुकाने बंद असतील, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजार व मॉल सर्वकाळ बंद राहतील. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सोडून इतर आस्थपनांबाबत सविस्तर आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. त्याचा संदर्भ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.