गडचिरोली : येथील एका तरुणीला भूलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा व लैंगिक संबंधाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन. सव्वातीन लाख रुपयांची खंडणी मागणारा पोलिस शिपाई पद्माकर भगवान भोजने (वय ३८) याला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या पोलिस विभागात कार्यरत पोलिस शिपाई पद्माकर भोजने याने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे कृत्य केले आहे. तो विवाहित असतानादेखील पत्नीला घटस्फोट दिल्याचा बहाणा करून त्याने २७ वर्षीय पीडित तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देत आपल्या जाळ्यात ओढले होते.
भोजने हा गडचिरोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असून त्याने भूलथापा देऊन पीडित युवतीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेचे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर, लैंगिक शोषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेकडे दीड लाखांचे दागिने आणि रोख सव्वातीन लाख रुपयाच्या खंडणीचीही मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.