Gadchiroli Flood News : एकाच दिवशी ९३ लोकांना पुरातून काढले सुखरूप

Gadchiroli latest news in marathi |यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीत शनिवार(ता. २७) हा दिवस आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा ठरला.
gadchiroli flood update monsoon disaster management team save 3 lives
gadchiroli flood update Sakal
Updated on

गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीत शनिवार(ता. २७) हा दिवस आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा ठरला. आधीच पूरस्थितीसदृश परिस्थिती असताना त्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी ९३ जण अनपेक्षितपणे पुरात अडकले होते.

पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्परता दाखवत एसडीआरएफ, महसूल, पोलिस विभाग आणि आपदा मित्रांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. यात पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी गडचिरोलीत येणाऱ्या भामरागड तालुक्यातील २९ जणांचाही समावेश आहे.

आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी यांनीही तत्परतेने या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन लोकांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. गडचिरोली तालुक्यातील चांदाळा गावानजीकच्या कुंभी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करायला गेलेले नागरिक अडकून पडले होते.

याची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने एकूण ५९ व्यक्तींना दोराच्या मदतीने वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. यामध्ये एका अंध व्यक्तीचासुद्धा समावेश होता.कुंभी (मोकासा) येथून वैद्यकीय सुविधेची गरज असलेल्या दोन महिला आणि एका व्यक्तीला असे तिघांना नदीच्या पुरातून बोटीद्वारे सुखरूप काढून गडचिरोली मुख्यालयी पोहोचवण्यात आले.

याशिवाय याच गावातील ६ बेरोजगार पुरामुळे गडचिरोलीत पोलिस भरतीच्या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना कळताच त्यांनी या बेरोजगारांना पुरातून बाहेर काढण्याची सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाला केली.

gadchiroli flood update monsoon disaster management team save 3 lives
Gadchiroli Rain : कर्जेली गावाला पुराचा वेढा, तिच्या जिवाला धोका; गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बचाव पथक आले धावून

त्यामुळे त्या ६ परीक्षार्थींना राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ), आपत्कालीन पथक, महसूल व पोलिस पथकांच्या साहाय्याने सर्वांना बोटच्या साहाय्याने पुरातून बाहेर काढून वेळीच गडचिरोली मुख्यालयी पोहचविण्यास मदत केली. याच पद्धतीने मार्ग बंद असलेल्या भामरागड मुख्यालयातील २३ परीक्षार्थींना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून गडचिरोलीत पोहोचण्यासाठी मदत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.