गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दोघेजण रविवारी ८ सप्टेंबर रोजी बोटीच्या साहाय्याने गुंडेनुर नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बोट उलटली. तुडुंब भरलेल्या नाल्यातून एकजण कसेबसे बाहेर पडला तर दुसरा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दोन दिवसांनंतर गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह शोधण्यासाठी गेले असता तो तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर अडकून होता.