Video: काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ; दोन्ही मुलांचे मृतदेह घेऊन आई-वडिलांचा चिखलातून प्रवास; गडचिरोलीतल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव

Gadchiroli Video: रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आई-वडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.
Video: काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ; दोन्ही मुलांचे मृतदेह घेऊन आई-वडिलांचा चिखलातून प्रवास; गडचिरोलीतल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव
Updated on

Vijay Wadettiwar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून चालत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातला या व्हिडीओ बघून हळहळ व्यक्त होतोय. वडेट्टीवारांनी आरोग्य व्यवस्थेवरुन सरकारला धारेवर धरलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.