Police Force Raksha Bandhan : गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम गर्देवाड्यात साजरा केला रक्षाबंधन

गर्देवाडा येथील महिला पोलिस अंमलदार व भगवंतराव आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधली.
gadchiroli Police Force Raksha Bandhan gardewada celebration
gadchiroli Police Force Raksha Bandhan gardewada celebrationsakal
Updated on

गडचिरोली - जिल्ह्यातील माओवादग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेडरी पोलिस मदत केंद्रातील गर्देवाडा येथे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांनी भेट देत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी गर्देवाडा येथील महिला पोलिस अंमलदार व भगवंतराव आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.