सुरजागड लोह खनिज पट्ट्यात वाढ झाल्यास रोजगारासह विकासाची संधी

जनतेचा आर्थिक विकास साध्य होऊ शकतो
Gadchiroli Surjagad Iron ore mining
Gadchiroli Surjagad Iron ore mining
Updated on

गडचिरोली : सध्या सुरजागड येथे सुरू असलेल्या लोहखनिज उत्खनन पट्ट्यात शासनाने वाढ केल्यास या भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी प्राप्त होऊन जनतेचा आर्थिक विकास साध्य होऊ शकतो. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते.

एटापल्ली तालुका हा आदिवासीबहूल, नक्षलग्रस्त व उद्योगविरहित भाग म्हणून आजपर्यंत ओळख असला असला तरी या ठिकाणी लॉयड मेटल्स ॲण्ड एजर्नी लिमिटेडने जेव्हापासून लोह खनिज उत्खननास सुरुवात केली तेव्हापासून परिस्थिती बदलली असून आज हजारो कुशल व अकुशल कामगार याठिकाणी काम करित आहेत.

सुरुवातीच्या काळात काही राजकीय व सामाजिक व्यक्ती व संस्थांनी या प्रकल्पाबद्दल जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले होते. परंतु, आता या भागातील जनता औद्योगिक विकासामुळे सुज्ञ झाली असून लॉयड मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडने परिसरात रोजगारासोबतच जनतेला मुलभूत सुविधा देण्यासाठी सुरुवात केली आहे. या भागात रस्ते, सिंचन, शिक्षण व आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न चालविला आहे.

कंपनीतर्फे निर्माण होणारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल याचाच एक भाग असून परिसरात दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया होणार आहे. केंद्र शासनाने २००६ मध्ये अनेक कंपन्यांना लिज मंजूर केली. परंतु, लॉयड मेटल्स ॲण्ड एजर्नी लिमिटेड कंपनी वगळता कोणीही याठिकाणी आले नाही. लॉयड मेटल्स ॲण्ड एजर्नी लिमिटेड कंपनीला असलेल्या विविध आव्हानांमुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी २०२१ साल उजडले.

या कालावधीत कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला तरीही न डगमगता या भागाच्या विकासासाठी त्यांनी शेवटपर्यंत आव्हानांचा सामना केला. सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षांत लॉयड मेटल्स ॲण्ड एजर्नी लिमिटेड कंपनीने सुमारे २ ते ३ हजार स्थानिक जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जनसुनावणी होत असलेल्या १३ गावातील लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

प्रत्यक्षपणे जनता यासाठी जनसुनावणी साठी गडचिरोली येथे सहभागी होणार आहेत. आज या परीसरातील जनतेसाठी सुगीचे दिवस येऊ लागले असून आता उपलब्ध असलेला खाणपट्टा फार काळ जनतेला रोजगार उपलब्ध करून देणारा नसल्याने ३.० प्रतिवर्ष वरून १०.० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा वाढीव खाणपट्टा मंजूर करून लॉयड मेटल्स ॲण्ड एजर्नी लिमिटेड कंपनीला मिळाल्यास आगामी अनेक वर्षांसाठी स्थानिक हजारो जनतेला रोजगारासोबतच कोनसरी येथे होत असलेला लोहप्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

या लोहप्रकल्पात हजारो कुशल व अकुशल व्यक्तींना प्रत्यक्ष काम उपलब्ध करून देण्यात ‌येणार आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भात विविध ठिकाणी आर्यन प्रोजेक्ट निर्माण करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत.

प्रकल्पबाधित १३ गावांचा विकास आराखडा

एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत पाच गावे, तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत पाच गावे व नागुलवाडी ग्रामपंचायत तीन गावे अशी १३ बाधित गावांची जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. यात बांडे, मल्लपाड, मंगेर, परसलगोंदी, सुरजागड, हेडरी, इकारा, करमपल्ली, पेठा, झारेगुडा, कुदारी, नागुलवाडी, मोहुर्ली ही गावे लोहप्रकल्पामुळे बाधित होत आहेत. म्हणून शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी जनसुनावणी ठेवली आहे.

सदर गावांत प्रत्येक घरातील व्यक्तीला रोजगार मिळून मुलभूत विकास व्हावा, यासाठी १३ गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्या माध्यमातून या गावांचे रूप निश्चितच पालटणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सुरजागड लोह प्रकल्प कंपनीला ३४८.०९ हेक्टर आर खाण लीज लोह खनिज उत्खनन ३.० प्रतिवर्ष ते १०.० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या उत्पादनासाठी प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी आज २७ ऑक्टोबर २०२२ ला गडचिरोली येथे ठेवण्यात आली आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात दुपारी १२ वाजता ही जनसुनावणी होणार आहे. या जनसुनावणीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार असून औद्योगिक विकासासाठी होणाऱ्या या सुनावणीसाठी स्थानिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.